Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य

अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराज स्मारक अभिवादन सोहळ्यात अनेक राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 18, 2025 | 09:08 PM
ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य

ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराज स्मारक अभिवादन सोहळा
  • सोहळ्यात अनेक राजकीय नेत्यांची हजेरी
  • राधाकृष्ण विखे पाटलांचा माध्यमांशी संवाद
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी बहुतांश ठिकाणी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढविण्याबाबत चर्चा करणार आहोत. महायुती म्हणून निवडणुकांना समोरे जाण्याचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर चौकात उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अभिवादन कार्यक्रमानंतर विखे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते, संपत बारस्कर, निखिल वारे, अविनाश घुले, सागर वेग, विनायक देशमुख, स्मारक समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले

मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एक झाल्याचा कोणताही परिणाम होणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असे जाहीर केले होते. याबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होईल, असे सांगितले आहे. अहिल्यानगर महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवावी, अशी बहुतांश कार्यकर्त्यांची इच्छा आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशीच युती होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीवर परिणाम होईल का? याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कोणी एकत्र आले म्हणून परिणाम होत नसतो.

युती सोडून इतरांसोबत जाणे योग्य नाहीच

जनतेचा विश्वास सरकारवर आणि केलेल्या कामावर आहे. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही. पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र लढण्याची चर्चा आहे, याबाचत विखे पाटील म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढावे किवा नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु राज्यात महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करतोय. अशा वेळी इतर घटकांसोबत जाणे योग्य नाही.

Karjat News : अखेर उपोषण 12 तासांनी सुटलं; टाटा जलविद्युत प्रकल्प विरोधातील आंदोलनकर्त्यांची माघार

आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाई

छत्रपती संभाजी महाराज अभिवादन सोहळ्यास दुपारी चारच्या सुमारास शहरातील चार ढोल ताशा पथकांच्या मानवंदनेने झाली. यानंतर युवक युवतीनी तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, लाठीकाठी अशा मर्दानी खेळांच चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला. प्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने व साथीदारांनी महाराष्ट्राचा शाहिरी बाणा या पोवाड्याच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा जाज्वल्य इतिहास अधोरेखित केला. पोवाडा सादरीकरणात अफजलखानाचा वधाचा जिवंत देखावा कलाकारांना सादर केला.

Web Title: Ahilyanagar sambhaji maharaj smarak radhakrishna vikhe patil on thackrey brother alliance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 09:08 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Radhakrushn Vikhe Patil

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: पाण्याचा एक थेंबही देणार नाही! रेल्वेसाठी अकोलेकर आक्रमक; संगमनेरचे आमदारही सहभागी
1

Ahilyanagar News: पाण्याचा एक थेंबही देणार नाही! रेल्वेसाठी अकोलेकर आक्रमक; संगमनेरचे आमदारही सहभागी

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?
2

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन
3

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम
4

Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.