कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील भिवपुरी येथे असलेल्या टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या नवीन प्रकल्पाच्या कामात स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना ठाकरे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाला स्थानिक आणि तालुक्यातील जनतेने मोठा पाठिंबा दिल्याने तणाव निर्माण झाला होता. शेवटी तब्बल 11 तासांनी टाटा कंपनी व्यवस्थापनाला उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या. दरम्यान या निमित्ताने तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
कर्जत तालुक्यातील टाटा पॉवर हाऊस येथे स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत,शेकापचे तालुका चिटणीस तानाजी मते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांनी सकाळी उपोषणाला सुरुवात केली होती. 17 डिसेंबर रोजी उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावल्याने शेवटी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुरुंग स्फोटामुळे तपकीरवाडी आणि धनगर वाडा येथील घरांचे होत असलेले नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेली घबराट,सुरुंग स्फोटामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई,दगडखानी यांना लोकवस्ती जवळ दिलेली परवानगी,मोठ्या प्रमाणावर केलेली वृक्षतोड आणि स्थानिक भूमिपुत्र यांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषण सुरू झाल्यानंतर कर्जत तालुक्याचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल,तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव,टाटा अधिकारी टाटा कंपनीचे अधिकारी अभिजीत पाटील,सीबी सिंग,मुंबई ऑफिस वसंत पिंगळे,विवेक माटे यांनी दुपार एक वाजता,त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता आणि रात्री नऊ वाजता मध्यस्थी करण्यासाठी उपोषण स्थळी येऊन चर्चा केली. मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्या सुटत नाहीत तोवर उपोषण सुरूच ठेवले जाईल अशी भूमिका कायम ठेवली होती.
स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील,भगवान भोईर,दीपक श्रीखंडे,बाबू घारे,संतोष पाटील,पंढरीनाथ राऊत यांच्याकडून कंपनी व्यवस्थापन यांच्याशी बोलणी केली जात होती. शेवटी रात्री दहा वाजता उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने 12 तासांनी उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र दुपारपासून असलेली गर्दी आणि अचानक रात्री नऊ नंतर वाढलेली गर्दी यामुळे पोलीस प्रशासनाने कंपनी व्यवस्थापन यांना निर्णायक भूमिका जाहीर करण्याची सूचना केली. त्यानंतर कंपनी व्यवस्थापन कडून अभिजित पाटील यांनी समजूतदार पणाची भूमिका घेऊन सर्व मागण्या मान्य करणारे पत्र मुंबईतून मंजूर करून घेतले आणि उपोषण स्थगित झाले.
कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित,पोलिस उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडून वेळोवेळी पाहणी केली जात होती.रात्री नऊ नंतर सर्व बाजूंनी दबाव वाढू लागला आणि कार्यकर्ते स्थानिक ग्रामस्थ कंपनी गेटवर गोंधळ घालू लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
Ans: टाटा जलविद्युत प्रकल्पाच्या नवीन कामात स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शेतकरी कामगार पक्षाने उपोषण सुरू केले होते.
Ans: 17 डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथील टाटा पॉवर हाऊस परिसरात उपोषणाला सुरुवात झाली.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत, शेकापचे तालुका चिटणीस तानाजी मते आणि माजी सभापती नारायण डामसे यांनी उपोषणाचे नेतृत्व केले.






