Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: रस्त्याच्या त्रासातून सुटका कधी हेणार, ठेकेदारांचा नियोजनशून्य कारभार

नगरपरिषद निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून शहरातील पारगाव रस्ता, शनीचौक ते जोधपूर मारुती चौक रस्ता ते सिद्धार्थनगर रस्ता हे रस्ते एका बाजूने खोदून ठेवण्यात आलेले आहेत. महिने उलटून देखील रस्त्याची कामे रखडलेली आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 24, 2026 | 08:42 PM
Ahilyanagar News: रस्त्याच्या त्रासातून सुटका कधी हेणार, ठेकेदारांचा नियोजनशून्य कारभार

Ahilyanagar News: रस्त्याच्या त्रासातून सुटका कधी हेणार, ठेकेदारांचा नियोजनशून्य कारभार

Follow Us
Close
Follow Us:

 

  • रस्त्याच्या त्रासातून सुटका कधी हेणार
  • ठेकेदारांचा नियोजनशून्य कारभार
  • नगरपरिषदेच्या ठेकेदाराला सूचना
शहरात चार महिन्यापासून खोदून ठेवलेले रस्ते, शहरात पसरलेले धुळीचे साम्राज्य, रस्त्याची अपूर्ण कामे त्यामुळे होणारी वाहतूकीची कोंडी या सगळ्या समस्यांमुळे श्रीगोंदेकर जनता आधीच त्रस्त असताना, बीड, मुंबई, दौंड, जामखेड या श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शहरातील लेंडी नाल्या वरील पुलाच्या बांधकामाला संबंधित ठेकेदाराने सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारतळावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे दौंड जामखेड या रस्त्यावरील वाहतूक शहरातील बायपास रस्त्याने शनिचौकमार्गे बगाडे कॉर्नरमार्गे सिद्धार्थनगर अशी वळवण्यात आली आहे. त्यामुळे आता श्रीगोंदेकरांसमोर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. लेंडी नाल्यावरील पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या कामाबाबत सूचना देणारे, वाहतूक वळवण्याबाबत मार्गदर्शक फलक महात्मा फुले सर्कल तसेच पारगाव रस्ता, शनि चौक या ठिकाणी लावलेले असले तरी ते योग्य पद्धतीने लावलेले नसल्यामुळे नवीन येणाऱ्या वाहन चालकांना शहरातून बाहेर जाण्यासाठी नेमक्या कोणत्या रस्त्याचा वापर करायचा हे समजतं नाही. अनेक वाहन चालक चुकून दुसऱ्याच रस्त्याला जात आहेत. जामखेडकडे जाणारे अनेक बसचालक, ट्रकचालक शनिचौकातून शहरातील वडाळी रस्त्याला जात आहेत.

रस्त्याच्या कामानंतर पुलाचे काम गरजेचे

नगरपरिषद निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून शहरातील पारगाव रस्ता, शनीचौक ते जोधपूर मारुती चौक रस्ता ते सिद्धार्थनगर रस्ता हे रस्ते एका बाजूने खोदून ठेवण्यात आलेले आहेत. महिने उलटून देखील रस्त्याची कामे रखडलेली आहेत, रस्ते खोदल्यामुळे एकाच बाजूने वाहतुक सुरु असताना आता बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक पुलाच्या कामामुळे याच अपुऱ्या रस्त्यानवरून वळल्यामुळे श्रीगोंद्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्याची कामे आधी पूर्ण करून मग पुलाचे काम सुरु करणे जरुरी असताना सुद्धा ठेकेदाराने केलेल्या घाईमुळे लोकांना यावा त्रास सहन करावा लागत आहे.

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

नगरपरिषदेच्या ठेकेदाराला सूचना

पारगाव रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबत कुठलीच ताकीद दिली जात नसल्यामुळे हे काम तसेच ठप्प आहे. आधीच रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे शहरातून एकेरी वाहतूक सुरु असतानाच, आता दौड जामखेड रस्त्याची सगळी वाहतूक त्याच अपूर्ण रस्त्याला वळवल्यामुळे सगळा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्या सोबतच दौंड जामखेड रस्त्यावर वाहतूक वळविल्याबाबत आणि रस्ता बंद असून पर्यायी रस्ता कोणता आणि कसा वापरायचा, याबाबत शहरातील मुख्य भागात वाहनचालकांना दिसेल असे दिशादर्शक फलक लावण्याबाबत नगरपरिषदेने संबंधित ठेकेदाराला सूचना करणे गरजेचे आहे.

मोठया लोकवस्तीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता

सरस्वती नदीवरील पुलाच्या पुढे वाहतूक वळण्याबाबत सुचना करणारा फलक लावलेला असला तरी, बसस्थानकाकडे जाणारा रस्ता सुरु असल्यामुळे अनेक वाहनचालक त्या रस्त्याचा वापर करून सरळ पुढे बाजारतळावर पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी जात आहेत आणि तिथून परत वळून पाठीमागे येत आहेत. रात्रीच्या वेळेस तर काही चालकांना नेमके बाहेर कुठून जायचे हे उमगत नसल्यामुळे ते शहरातील झेंडा चौक, जमादार गल्ली, कुरेशी गल्ली या अरुंद गल्ली बोळात आपली मोठी वाहने घालून तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड संतापले आहेत. अरुंद रस्ते आणि त्या भागात असणारी मोठी लोकवस्ती यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु

Web Title: Ahilyanagarwhen will we finally be free from the misery of these roads the contractors chaotic mismanagement continues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • traffic jam

संबंधित बातम्या

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा
1

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा

Ahilyanagar :  विक्रमसिंह पाचपुतेंच्या ‘पनीर आणि चीज’ भेसळ मुद्द्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा
2

Ahilyanagar : विक्रमसिंह पाचपुतेंच्या ‘पनीर आणि चीज’ भेसळ मुद्द्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा

Ahilyanagar : हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे Sangram Jagtaap
3

Ahilyanagar : हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे Sangram Jagtaap

Ahilyanagar : अहिल्यानगरचा होणार कायापालट ? विकासकामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर
4

Ahilyanagar : अहिल्यानगरचा होणार कायापालट ? विकासकामांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.