
फोटो सौजन्य: iStock
अहिल्यानगर येथील जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा उबाठा शहरप्रमुख किरण काळे यांनी केलेला आरोप बिनबुडाचा, निराधार आणि खोटा असल्याचे जैन मंदिर ट्रस्टचे (कापड बाजार) अध्यक्ष सुभाष मुथा यांनी स्पष्ट केले आहे. काळे यांनी केलेले सर्व आरोप मुथा यांनी ठाम शब्दांत फेटाळून लावले.
किरण काळे यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावून त्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांनी कार्यालय उभारल्याचा आरोप करत पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मुथा यांनी ट्रस्टच्या वतीने सविस्तर स्पष्टीकरण प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले.
Pune Leopard Attack: दैव बलवत्तर! दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट…; पारगावमध्ये महिलेसोबत घडले काय?
प्रसिद्धीपत्रकात अध्यक्ष सुभाष मुथा यांनी म्हटले आहे की:
जागेतून कोणतेही उत्पन्न न मिळाल्याने ती विकण्याचा विचार ट्रस्टतर्फे करण्यात आला होता. विक्रीतून मिळणारी रक्कम इतर ठिकाणच्या मंदिराला देणगी म्हणून देण्याचा निर्णयही चर्चेत होता. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी वृत्तपत्रात जागा विक्रीबाबत जाहीर नोटीस दिली होती. मात्र नंतर कळाले की जागा विक्री शक्य नाही. त्यामुळे नोटीस स्थगित करून कोणताही व्यवहार करण्यात आला नाही.
आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मोठा निर्णय; जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी
पुणे येथे एचएनडी होस्टेलची जागा आहे. त्या जागेत दिगंबर जैन मंदिर आहे. तसेच होस्टेल आहे. त्याचा खरेदी खताचा व्यवहार झाला होता. नगरमधील जागेची परिस्थिती वेगळी आहे. येथील जागेत कोणतेही मंदिर नाही, होस्टेल नाही. या जागेपासून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. साठेखत व खरेदीखतचा व्यवहार झालेला नाही, त्यामुळे पुणे येथील जागा व नगरमधील जागा याची तुलना होऊ शकत नाही, असे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सांगितले.
या जागेसंदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. नगरमधील जैन मंदिर जागा ट्रस्टची भाडेकरूंच्या ताब्यात आहे. ही जागा आ. संग्राम जगताप यांनी लाटली असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला असून तो आरोप जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी फेटाळून लावत तो आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे.