Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilynagar News: यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार? मुस्लिम व्यापाराना विरोध; भाविकांचे निर्णयाकडे लक्ष

मागील वर्षी जसे अहिल्यानगरमध्ये मढीच्या जत्रेत मुस्लिम व्यापारांना दुकाने लावून द्यायची की नाही? यावर गरादोळ माजला होता. अगदी तसाच गदारोळ पुन्हा होण्याची शक्यता आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 26, 2026 | 08:17 PM
यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार?

यंदा मढीची यात्रा पुन्हा तापणार?

Follow Us
Follow Us:
  • पाथर्डी तालुक्यातील मढीची यात्रा पुन्हा तापणार?
  • यात्रेच्या पाश्वभूमीवर मुस्लिम व्यापारांना विरोध
  • देवस्थान आणि ग्रामपंचायतीत वाढ
पाथर्डी तालुक्यातील मढी येथील प्रसिद्ध यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावण्यास परवानगी द्यायची की नाही, या मुद्द्यावर गेल्या वर्षी मोठा वाद निर्माण झाला होता. यंदाही तोच मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून गावाचे सरपंच संजय मरकड यांनी मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावू देणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे यात्रेपूर्वीच वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

मागील वर्षीही झाला होता वाद

गेल्या वर्षीही सरपंच संजय मरकड यांनी मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावण्यास विरोध दर्शविला होता. मंदिर व यात्रेचे पावित्र्य राखले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी ही भूमिका घेतली होती. त्यांच्या भूमिकेला गावातील काही घटकांचा पाठिंबा मिळाला, तर काहींनी तीव्र विरोधही दर्शविला. त्या वेळी काही राजकीय नेत्यांनी मढी येथे भेट देत मरकड यांच्या भूमिकेला समर्थन दिले होते.

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपाकडून शास्तीमाफी योजना जाहीर, 100 टक्के थकीत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत जमा करण्याचे आवाहन

यंदाही तीच भूमिका कायम

यावर्षीही सरपंच मरकड यांनी मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मढी यात्रेत व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान, मध्यंतरी मढी देवस्थानच्या विश्वस्त मंडळात बदल झाला आहे. यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना परवानगी द्यायची की नाही, याबाबत नव्या विश्वस्त मंडळाने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे महसूल प्रशासन व देवस्थान समिती यावर काय निर्णय घेणार, याकडे भाविक आणि व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

सरपंचांची भूमिका

सरपंच संजय मरकड यांनी सांगितले की, यात्रेत दुकाने लावण्याचा अधिकार ग्रामपंचायतीचा असून देवस्थान समितीने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये. यात्रेत येणाऱ्या सर्व व्यावसायिकांच्या दुकानांतील कर्मचाऱ्यांचे आधारकार्ड तपासले जाईल. तसेच मढी गावातील नवीन मुस्लिम व्यावसायिकांनाही दुकाने लावण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

देवस्थान विश्वस्तांची भूमिका

मढी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी सांगितले की, यात्रेचे पावित्र्य राखले जावे, यासाठी विश्वस्त आग्रही आहेत. मात्र कोणाला व्यवसाय करू द्यायचा हा निर्णय ग्रामपंचायत आणि देवस्थान या दोन स्वतंत्र संस्थांशी संबंधित आहे. यापुढे प्रशासन आणि संबंधित संस्था काय निर्णय घेतात, यावरून यात्रेतील वातावरण ठरणार आहे.

Web Title: Ahilynagar news pathardi madhi yatra will muslim traders get permission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News
  • Pathardi

संबंधित बातम्या

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
1

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
2

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
3

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.