Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: मराठा आंदोलनात ‘कोट्यवधींचा खेळ’? जुने सहकारी बारस्कर यांची ED आणि आयकर विभागाकडे तक्रार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नवे वादग्रस्त वळण मिळाले आहे. जुने सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी आंदोलनाच्या आडून काही जणांनी कोट्यवधींचा आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2026 | 01:01 PM
मराठा आंदोलनात ‘कोट्यवधींचा खेळ’? जुने सहकारी बारस्कर यांची ED आणि आयकर विभागाकडे तक्रार

मराठा आंदोलनात ‘कोट्यवधींचा खेळ’? जुने सहकारी बारस्कर यांची ED आणि आयकर विभागाकडे तक्रार

Follow Us
Follow Us:
  • मराठा आरक्षण आंदोलनाला नवे वादग्रस्त वळण
  • मनोज जरांगे अडचणीत?
  • जुने सहकारी बारस्कर यांची ED आणि आयकर विभागाकडे तक्रार
पोपट पिटेकर,अहिल्यानगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता एक नवे आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. जरांगे यांचे जुने सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अजय महाराज बारस्कर यांनी आंदोलनाच्या आडून काही जणांनी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ घेतल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आंदोलनातून एक विशिष्ट ‘लाभार्थी टोळी’ तयार झाली असल्याचा दावा करत बारस्कर यांनी या प्रकरणाची थेट सक्तवसुली संचलनालय (ED) आणि आयकर विभागाकडे (Income Tax) तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत अजय महाराज बारस्कर यांनी जमीन व्यवहार, अवैध वाळू उपसा आणि कथित बेहिशेबी संपत्तीबाबत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा केला. तसेच या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Gadchiroli Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, एक ठार, तर ३३ प्रवासी जखमी

“उपोषणला विरोध नाही, पण…”

पत्रकार परिषदेत बोलताना बारस्कर यांनी स्पष्ट केले की, “माझा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला किंवा आंदोलनाला अजिबात विरोध नाही. त्यांनी आपले उपोषण खुशाल करावे. मात्र, या पवित्र आंदोलनाचा आडोसा घेऊन नेमका कुणाला फायदा झाला, हे मराठा समाजासमोर येणे अत्यंत गरजेचे आहे.”

पांडुरंग तारक यांच्यावर जमीन खरेदीचे आरोप

बारस्कर यांनी पांडुरंग वसंतराव तारक यांच्यावर अंतरवाली सराटी आणि आसपासच्या परिसरात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप केला. “पूर्वी अत्यंत सामान्य परिस्थितीत असलेली ही व्यक्ती अल्पावधीतच एवढी श्रीमंत कशी झाली? एवढा पैसा आला कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संजय कटारे यांचा ५ कोटींचा दंड माफ?

आंदोलनाच्या प्रभावाचा वापर करून संजय कटारे यांच्यावरील अवैध वाळू उपसा प्रकरणातील तब्बल ५ कोटी रुपयांचा महसूल दंड माफ करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप बारस्कर यांनी केला. या संदर्भात आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

गंगाधर काळकुटे यांच्यावरही निशाणा

या टोळीमध्ये गंगाधर काळकुटे यांचाही समावेश असल्याचा आरोप करत बारस्कर यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि वाळू व्यवसायातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ED आणि आयकर विभागाकडे धाव

अजय महाराज बारस्कर यांनी दावा केला आहे की, या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची आणि कथित बेनामी मालमत्तांची सविस्तर तक्रार त्यांनी ED आणि आयकर विभागाकडे पाठवली आहे. आंदोलनाच्या नावाखाली गोळा झालेला पैसा आणि अचानक वाढलेली मालमत्ता यांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या संवेदनशील लढ्याला बदनाम करून स्वतःचे खिसे भरणारी एक टोळी सक्रिय असल्याचा आरोप आता जरांगे यांच्याच जुन्या सहकाऱ्याने केल्यामुळे, आगामी काळात यावरून महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Mumbai News: तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास खैर नाही! पहाटेच रस्त्यावर उतरत पालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दट्ट्या

Web Title: Ajay maharaj barskar allegations on manoj jarange maratha reservation movement news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • ED
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Supreme Court News: बेहिशेबी मालमत्ता’ प्रकरणात राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
1

Supreme Court News: बेहिशेबी मालमत्ता’ प्रकरणात राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Manoj Jarange: ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका…,’ मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत; २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
2

Manoj Jarange: ‘कुणाच्याही दबावाला बळी पडू नका…,’ मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या तयारीत; २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
3

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.