
'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती
कराड: आम्हाला बहुमत मिळाले म्हणून विरोधकांनी ईव्हीएमवर खापर पडू नये. छत्तीसगडमध्ये निवडून आल्यावर तिथे ईव्हीएम घोटाळा झाला नाही? लोकसभेला आमच्या झालेल्या पराभवावेळी ईव्हीएम घोटाळा झाला नाही? असे सांगत ते म्हणाले, लोकसभेच्या पराभवातून धडा घेत आम्ही काम केले. जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या. त्यामुळे महायुतीला हे यश मिळाले असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. हसन मुश्रीफ, आ. मकरंद पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी बसून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ. मुख्यमंत्रीपदावर सरकारचा कोणताच फॉर्म्युला अजून तरी ठरलेला नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झाली असून सर्व अधिकार मला दिले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा नेता म्हणून निवड झाली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची ते ठरवतील. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असे त्यांनी सांगितले.
AIMIM नेत्याचा मोठा दावा, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार? ओवेसीचा असणार पाठिंबा
युगेंद्र हा व्यावसायिक असून त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. लोकसभेला माझी चूक झाली, हे मी सर्वांना सांगून दमलो. तरीही माझ्या सख्ख्या पुतण्याला माझ्या विरोधात उभं करायचं काहीच कारण नव्हतं. माझी चूक झाली, म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा काय? असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा पाया रचण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले, यामुळे महाराष्ट्र कदापि त्यांना विसरणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच आम्ही पुढे जाण्याचे काम चालू ठेवणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या दिशेने मार्गाने आपण सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांने आम्ही महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एका विचाराने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी स्थिती नाही. आम्ही आजच तिघेही एकत्र बसून स्थिर सरकार देऊ. आमच्याकडे बहुमत आहे, विरोधी पक्ष नेता होण्यासाठी लागणारे संख्याबळ विरोधकांकडे नाही. मात्र, विरोधकांचा मानसन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही कायम ठेवू. त्यांनी मांडलेल्या प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करणार आहोत. राज्य सर्व क्षेत्रावर आघाडीवर कसे राहील, ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू कमी पडणार नाही.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित…; मनोज जरांगे पाटलांनी दिली पहिली
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी समाधीस्थळी अभिवादन केले. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी काका अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार हे आमने-सामने आले. यावेळी रोहित पवार यांनी काका अजित पवार यांची भेट घेत वाकून नमस्कार केला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या हातात हात देत ‘दर्शन घे काकाच’, रोहित तू थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं,’ असा मिश्किल टोलाही लगावला.