Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपतींच्या गादीचा अपमान खपवून घेणार नाही; काँग्रेसच्या कालच्या राड्यावरून अजित पवारांचा हल्लाबोल

मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील चांगलेच संतापले होते. त्यावर आज अजित पवारांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 05, 2024 | 10:13 PM
कॉंंग्रेसच्या कालच्या राड्यावरून अजित पवारांचा हल्लाबोल

कॉंंग्रेसच्या कालच्या राड्यावरून अजित पवारांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉंंग्रेसकडून मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजेश लाटकर यांना उमदेवारी दिल्यामुळे लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कॉंग्रेसचे नेते चांगलेच संतापले होते. माध्यमांसोरही त्यांना राग व्यक्त केला होता. त्यावर आज अजित पवारांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसला दिला. आज कोल्हापूरमध्ये महायुतीची सभा पार पडली. यासभेत ते बोलत होते.

हेही वाचा-Jharkhand Election 2024: अशा पद्धतीने होणार झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका; वाचा सविस्तर

कोल्हापुरात नेमकं काय घडलं?

विधानसभेच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजू लाटकर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. मात्र  अवघ्या 24 तासांत काँग्रेसने मधुरिमाराजे छत्रपती यांचं नाव जाहीर केलं. त्यामुळे नाराज राजू लाटकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. दरम्यान मधुरिमाराजे यांच्या निर्णयामुळे कॉंग्रेस आणि सतेज पाटील यांची मोठी गोची झाली.

अर्ज माघार घेताना सतेज पाटीलही उपस्थित होते. त्यांनी शाहू मराजांसमोर उघड उघड नाराजी व्यक्त केली.  मला तोंडघशी पाडायंच होतं तर निवडणुकीला उभं का राहिलं, माझी फसवणूक केली तुम्ही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर माध्यमांसोर दम नव्हता तर उभं का राहिला तेव्हाच का नाही सांगितल. मी पण माझी ताकद काय आहे ती दाखवली असती, असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला होता.

हेही वाचा-Bullet Train Bridge Collapsed : बुलेट ट्रेनच्या मार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार पुलाखाली दबल्याची भीती

त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून आणि राज्यभरातून टीकेचे झोड उठली होती. सतेज पाटील यांनी सारवासारव करत माफी मागितली. त्याच रात्री झालेल्या मेळाव्यात त्यांनी अश्रूही अनावर झाले होते. दरम्यान आज महायुतीची कोल्हापुरात प्रचार सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी सतेज पाटील यांचं नाव न घेता टीका केली. कोल्हापूरची गादी असेल किंवा सातारची गादी. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात छत्रपतींच्या गादीबद्दल आदर आहे. त्यामुळे त्यांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान, त्यामुळे छत्रपतींच्या गादीचा अपमान कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी आज दिला.

मग पहिलं मंदिर मुब्र्यात उभारू-देवेंद्र फडणवीस

सुरतेत महाराजांचे मंदिर बांधणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र २२ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सूरतेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला आहे. ठाकरे म्हणतात सगळीकडे छत्रपती शिवरायांचे मंदिरं उभारणार. मग सर्वात आधी मंदिर मुंब्रा येथे उभारू, आम्ही सर्व तुमच्या मदतीला येतो. महाविकास आघाडीकडे बोलायला काही नाही. गेल्या अडीच वर्षांत राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे काम केले आहे, त्याचे हे उत्तर देऊ शकत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

 

Web Title: Ajit pawar react on satej patil comment on madhurimaraje withdraw nomination from maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 09:49 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
3

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार
4

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.