Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकार आणि पोलीस झोपा काढतायत का ? शशिकांत वारिसे हल्ला प्रकरणानंतर अजित पवारांचा संताप

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वारिसे मृत्यू प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? असा सवाल विचारत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

  • By साधना
Updated On: Feb 11, 2023 | 01:51 PM
सरकार आणि पोलीस झोपा काढतायत का ? शशिकांत वारिसे हल्ला प्रकरणानंतर अजित पवारांचा संताप
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद: रत्नागिरीतील (Ratnagiri) पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वारिसे मृत्यू प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? असा सवाल विचारत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

[read_also content=”बाबो ! आली रे आली जगातली सगळ्यात वेगवान कार, महिंद्राच्या GT Battista चा स्पीड आणि किंमत जाणून घ्या https://www.navarashtra.com/automobile/fastest-car-in-the-world-gt-battista-launched-in-hyderanad-nrsr-368951.html”]

औरंगाबादच्या पैठण दौऱ्यावर असताना अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा घटना सतत घडत आहे. हे सरकार आल्यापासून अशा घटना घडत आहे. मात्र असे भ्याड हल्ले कोणीही सहन करणार नाही. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, त्यानंतर प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आता तशाच पद्धतीने कोकणमधील एका पत्रकारावर हल्ला करून, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. यामागचा मास्टरमाईंड कोण आहे हे देखील समोर आले पाहिजे. अशा घटना घडत असताना सरकार आणि पोलीस काय करत आहेत, हे सर्वजण झोप काढतायत का? असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.

ते म्हणाले की, राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होत असती तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे पाहावे. कायदा सुव्यवस्था कशी कायम राहणार. त्यामुळे या घटनेचा तपास झालाच पाहिजे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडे काय माहिती आहे हे मला माहित नाही. पण कुणाला कोणी धमकावत असेल आणि सातत्याने असे घडणे हे सरकारचे अपयश आहे. महाविकास आघाडीला कोणती अडचण येईल असं वक्तव्य मी करणार नाही.

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबद्दल अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी करण्यामागचा सूत्रधार दुसराच दिसतोय, मतांचे विभाजन करण्यासाठी हे सुरु आहे.  आदित्य ठाकरे हे सोमवारी जाणार आहेत. सचिन अहिर बंडखोरी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार होते. उद्धव ठाकरे हे त्यांच्या मतदारांना आवाहन करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

Web Title: Ajit pawar reaction on shashikant warise death case nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2023 | 01:42 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar news
  • Aurangabad news
  • Marathi News
  • Paithan

संबंधित बातम्या

मिलिंद इंगळे ‘मुखातिब’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला, नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
1

मिलिंद इंगळे ‘मुखातिब’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला, नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?
2

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
4

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.