Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य

अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ आणि इतर जिल्ह्यातील ४० अशा एकूण ५१ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून पर्यटकांशी सतत संपर्क साधत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2025 | 02:35 AM
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य

प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर, पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटक, भाविकांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ आणि इतर जिल्ह्यातील ४० अशा एकूण ५१ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून पर्यटकांशी सतत संपर्क साधत आहे. उत्तराखंडच्या प्रशासनाशी सुद्धा राज्य शासन सातत्याने संपर्कात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व त्यांना महाराष्ट्रात लवकरात लवकर परत आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत,अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक :

1) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र

माहितीसाठी संपर्क: 93215 87143/ 022-22027990/022-22794229

2) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड

संपर्क 0135-2710334/8218867005

सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

उत्तरकाशीमध्ये पुण्यातील मंचर भागात राहणारे सुमारे २४ नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या टॅग करत या पर्यटकांचा शोध घेण्याचे आणि त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी यातील काही पर्यटकांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांकही दिले आहेत.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील धराली येथे मंगळवारी (5 ऑगस्ट) झालेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण उत्तराखंडमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खीर गंगा नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. या आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या महापुरात रस्ते, घरे, दुकाने, सर्वकाही पाण्यात वाहून गेले आहे, नदीच्या पाण्यात अनेक वाहनेही वाहून गेली आहेत.

Web Title: Ajit pawar said each citizen came safely in maharashtra is our priority uttarkashi cloudburst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Heavy Rain
  • maharashtra
  • Uttarakashi

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.