Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AJit Pawar: “लाडकी बहीण आणि वीज कर्जमाफीची योजना…”; कोल्हापुरातून काय म्हणाले अजित पवार?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी संविधानावर इतकी चांगली चर्चा झाली. अधिवेशनाच्या चार आठवड्यामध्ये आम्ही दररोज नऊ तास काम केलं. यामुळं अनेक लक्षवेधी प्रश्न मार्गी लागले, असे पवार म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2025 | 09:29 PM
AJit Pawar: “लाडकी बहीण आणि वीज कर्जमाफीची योजना…”; कोल्हापुरातून काय म्हणाले अजित पवार?
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन, संतोष देशमुख हत्याप्रकरण, ‘सौगात-ए-मोदी’ कार्यक्रम, लाडकी बहीण योजना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी, अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आमच्याकडं पूर्ण बहुमत असताना देखील विधिमंडळाचं काम रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही. कोणी काय म्हणावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

“अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी संविधानावर इतकी चांगली चर्चा झाली. अधिवेशनाच्या चार आठवड्यामध्ये आम्ही दररोज नऊ तास काम केलं. यामुळं अनेक लक्षवेधी प्रश्न मार्गी लागले, विरोधकांकडे कोणताच मुद्दा आता राहिलेला नाही. त्यामुळं ते वेगळे काही तरी मुद्दे काढत आहेत. काही अग्रलेख देखील लिहिले आहेत. ज्यामध्ये नुसतं विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून दहा-पंधरा मिनिटं घोषणा द्यायचं आणि सभागृहात येऊन बसायचं. प्रसारमाध्यमातून राज्याच्या जनतेला आम्ही फार काही काम करतोय, असं दाखवून द्यायचं असा केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी केला जात आहे.

सभागृहात विरोधकांची उपस्थिती जास्त नव्हती, फार कमी लोक उपस्थिती रहायचे, जे कामकाज आम्ही हाती घेतलं होतं, हे व्यवस्थित पार पडलेलं आहे, आमच्याकडे पूर्ण बहुमत असताना देखील विधिमंडळाच काम रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही. तसंच कोणी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे”, असं अजित पवार यांनी सांगितले.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “ब्रम्हदेव आले तरी…”

“बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. कुठंही राजकीय हस्तक्षेप नसून उज्वल निकम यांच्यासारखे प्रख्यात वकील तिथं नेमले गेलेत, इथं कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही, जो चुकीचा वागला असेल जो दोषी असेल जो मास्टरमाईंड असेल, त्याला तेथे शासन होणार”, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. तसंच, गेली ५३ वर्ष रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत अजित पवार म्हणाले की, “कोल्हापूर हद्दवाढीसंदर्भात राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केलीय. या भागातील लोकप्रतिनिधींचा देखील ऐकून घ्यावं लागत, त्या बैठकीत बऱ्याच अंशी मार्ग निघेल अशी चर्चा झाली आहे.

ईद निमित्त ‘सौगात-ए-मोदी’ हा कार्यक्रम भाजपानं आणलाय, याबाबत अजित पवारांना विचारलं असता, ते म्हणाले, “भाजपानं ‘सौगत-ए-मोदी’ कार्यक्रम सुरू केला आहे. चांगला काही कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटून घ्यायचं काय? सर्वधर्म समभाव हे आपल्या देशाची परंपरा आहे. त्यामुळं हा एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या पद्धतीनं इतर सण असतात, त्या पद्धतीनं रमजान महिना देखील महत्त्वाचा असतो. त्यानिमित्त काही घटकाला शुभेच्छा देण्याकरता हा कार्यक्रम आणला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरनं गुन्हा कबूल केला असेल तर त्याबाबतची कागदपत्रं तयार करून संबंधित व्यवस्थेसमोर मांडलं जाईल आणि दोषी असेल त्यांना शासन केले जाईल.

“आर्थिक नियोजनात कर्नाटक सरकारची परिस्थिती आज काय झाली आहे, पाहिलं आहे का? केरळला कोर्टात जाऊन अधिकच कर्ज मागावं लागलं, मात्र आम्ही राज्याची आर्थिक स्थिती विस्कटणार नाही. राज्याच हित साधेल असा विचारपूर्वक अर्थसंकल्प सादर केलाय. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही अर्थसंकल्पातून केला आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातील लाडकी बहीण योजना आणि वीज कर्जमाफीची योजना चालू ठेवली जाणार आहे. आमची आर्थिक परिस्थिती बघता सर्व योजना सुरू करणार आहोत. आम्ही दिलेल्या शब्दापासून बाजूला गेलो नाही. आम्ही ५ वर्षासाठी जी आश्वासन दिली आहेत, ती पुढील ५ वर्षांत टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार आहोत”, असेही अजित पवारांनी सागितले.

Web Title: Ajit pawar statement on ladki bahin yojana and free eletricity scheme at kolhapur visit marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • kolhapur news
  • Mahavikas Aghadi

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
3

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी
4

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.