• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dcm Ajit Pawar Clear Government Roleabout Purandar Airport Saswad Marathi News

Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “ब्रम्हदेव आले तरी…”

पुरंदरचे विमानतळ पुण्यापासून जवळ आहे. वाहतुकीच्या दृष्टीने सर्वांना सोयीचे आहे. त्यामुळे ते करावेच लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2025 | 05:26 PM
Purandar Airport: पुरंदर विमानतळाबाबत अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, "ब्रम्हदेव आले तरी..."

पुरंदर विमानतळाबाबत अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सासवड: पुरंदरचा विमानतळ शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी शासनाने पूर्ण तयारी केली आहे. तुमचे आमदार प्रकल्पासाठी खूप आग्रही असून खासदार सुद्धा सकारात्मक आहेत. त्यामुळे थोड्याच दिवसात ड्रोनद्वारे सर्व्हे होईल. आणि लगेच भूसंपादनाची पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कितीही विरोध केला तरी तुम्हीच काय, पण ब्रम्हदेव आले तरी विमानतळ प्रकल्पाचे काम थांबणार नाही,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सध्या राज्य शासनाचे अधिवेशन सुरू असून पुरंदर मधील विमानतळ प्रकल्प बाबत शासन दररोज एक एक अध्यादेश पारित करीत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमित झाले असून प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासन वेगवेगळ्या घोषणा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती तालुक्यातील होळ या गावी भेट घेतली. यावेळी बोलताना बारामतीजवळ विमानतळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही लोक अजित पवार यांनी विमानतळ नेले म्हणून ओरड करीत होते. पुरंदरचे विमानतळ पुण्यापासून जवळ आहे. वाहतुकीच्या दृष्टीने सर्वांना सोयीचे आहे. त्यामुळे ते करावेच लागेल असे ही स्पष्ट केले.

यावेळी सोमेश्वरचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, माजी जि. प. सदस्य दत्तात्रय झुरंगे, पी एस मेमाणे, पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे, खानवडी सरपंच स्वप्नाली होले, वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर, भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुंभारकर, जितेंद्र मेमाणे, ज्ञानदेव कुंभारकर, शांताराम कुंभारकर, सतीश कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, राजेंद्र कुंभारकर, विठ्ठल मेमाणे,  यांच्यासह विमानतळ प्रकल्प बाधित वनपुरी, उदाचिवाडी, खानवडी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Purandar Airport: “जबरदस्ती केली तरी …”; पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शासनाला शेतकऱ्यांचा इशारा

काही लोक तुम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहोत, काही तरी मार्ग काढू असे सांगून वेळ मारून तुमची समजूत काढतील पण अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला करतानाच मला खोटे बोलायला आवडत नाही असेही स्पष्ट केले.

दरम्यान आमदार विजय शिवतारे यांनी विमानतळ प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितले असून त्यांनीही अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या असल्याचे अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांना तुम्हीच निवडून दिले आहे, मी संभाजीराव झेंडे यांना उभे केले होते पण तुम्ही त्यांना मातीत गाडून टाकले. अशा शब्दात आपला रोषही व्यक्त केला.

आम्हाला अधिकारी कोणतीही माहिती देत नाहीत त्यामुळे आमच्यात भीतीचे वातावरण असून आम्हाला आश्वस्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असता मी तुम्हाला मोकळे आश्वासन देऊ शकत नाही. काही लोक म्हणतील आपण विरोध करू, आंदोलन करू, पण तसे काही करू नका. कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून शासनाला तशा सूचना दिल्या आहेत. परंतु तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ देणार नाही एवढी काळजी घेतली जाईल.

अजित पवार यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन

दरम्यान आम्हाल कोणीही काही माहिती देत नाही असे सांगताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना फोन लावून तातडीने शेतकऱ्यांची बैठक घ्यावी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, आपण त्यांना काय देणार आहे याची सविस्तर माहिती द्यावी अशा सूचना केल्या. तसेच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणे शासनाला परवडणारे नाही. त्यामुळे शांततेच्या मार्गाने त्यांचे समाधान करावे असेही अजित पवार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना फोन करुन लगेच सांगितले.

Web Title: Dcm ajit pawar clear government roleabout purandar airport saswad marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Purandar Airport
  • Saswad News

संबंधित बातम्या

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
1

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…;  150 कर्मचारी तैनात
2

Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
3

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…
4

Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार;  १४ ते १५ बदलांची चर्चा

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

व्हिडिओ

पुढे बघा
RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.