Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

महापालिका निवडणुका  महाविकास आघाडीच्या म्हणून लढवणार की वेगवेगळ्या असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,   हा प्रश्न तीनही पक्षांनी मिळून सोडवायचा आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 04, 2025 | 02:17 PM
Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:
  • उद्धव ठाकरे आणि  मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा
  • महापालिका निवडणुका  महाविकास आघाडीच्या म्हणून लढवणार की वेगवेगळ्या
  • आताचं सरकार एका राजकीय पक्षासाठी काम करत आहे

Uddhav Thackeray Pune PC:  राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.  भाजपप्रणित महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून स्थानिक पातळीवर तयारीही सुरू झाली आहे.  यासगळ्यात गेल्या काही महिन्यांपासून  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अशातच पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांवर भाष्य केलं आहे.

२००५ पासून  आम्ही वेगळे झालो. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी एका मुद्द्यावर एकत्र आलो, आम्ही ५ जुलैला जो मेळावा घेतला, जर आम्हाला एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो. आताही आमच्या एक येण्यावरून  विरोधकांचे धाबे दणाणलेत. मराठी  माणूस एकवटल्यामुळे आपलं काय होणार, अशी भिती त्यांना वाटू लागली आहे.

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग दह्यात मिक्स करा ‘या’ बिया, झपाट्याने होईल केसांची घनदाट वाढ

महापालिका निवडणुका  महाविकास आघाडीच्या म्हणून लढवणार की वेगवेगळ्या असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले,   हा प्रश्न तीनही पक्षांनी मिळून सोडवायचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही आघाडी म्हणूल लढलो. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रपणे निवडणूक लढण्यात हरकत नाही.  पण आमची आघाडी आहे,  तीनही पक्षांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. जर तीनही पक्षांनी  आघाडीतून लढावसं वाटलं तर आघाडीतून लढू अन्यथा वेगळं लढावसं वाटलं तर वेगळं लढू. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी आम्ही हे ठरवू.  स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील युनिटचा विचार करूनच पुढे निर्णय घेतला जाईल.

बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस ठेवण्याबाबत उद्धव ठाकरे यांचे उत्तर

बाळासाहेब ठाकरे यांची बॉडी दोन दिवस का ठेवली, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता यावर बोलताना ते म्हणाले, “मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही,” असे सांगत त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर थेट भाष्य केले.

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचे सेवन, झपाट्याने कमी होईल चरबी

सरकारवर टीका

उद्धव ठाकरे यांनी वर्तमान सरकारवर निशाणा साधत म्हटले, “आताचं सरकार एका राजकीय पक्षासाठी काम करत आहे, देशासाठी नाही. तसेच मी वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनम वांगचूकला रासुका अंतर्गत अटक करून दडपशाही सुरू आहे. पण माध्यम म्हणून आपण खरंच हे दाखवतोय का? टीव्हीवर दाखवतोय का? त्या न्यायाने मला सांगा, तुम्हाला तरी मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का?” असे थेट पत्रकारांना प्रश्न उपस्थित केले.

रामदास कदमांच्या टिकेला उत्तर

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत रामदास कदम यांचे बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत केलेले विधान टाळून भाष्य केले. ते म्हणाले, “अशा गद्दारांवर मी बोलणार नाही. हो, अशा घाणेरड्या आरोपांमुळे वेदना होतात, पण ठिक आहे; गद्दारांना उत्तर देत बसत नाही,” असे सांगत त्यांनी या विषयाला फार महत्त्व दिले नाही.

Web Title: Will the municipal elections be contested in an alliance uddhav thackerays indicative statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti
  • Uddhav Balasaheb Thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
1

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: खेडमध्ये महायुतीत ठिणगी तर ‘या’ नगरपंचायतीमध्ये…
2

Maharashtra Politics: खेडमध्ये महायुतीत ठिणगी तर ‘या’ नगरपंचायतीमध्ये…

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी? भाजपचा ‘एकला चलो रे’चा नारा तर…
3

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी? भाजपचा ‘एकला चलो रे’चा नारा तर…

Maharashtra Politics: महायुतीमध्ये ‘रस्सीखेच’ आणि आघाडीमध्ये ‘बिघाडी’; ‘या’ तालुक्यात अद्याप निर्णय नाहीच
4

Maharashtra Politics: महायुतीमध्ये ‘रस्सीखेच’ आणि आघाडीमध्ये ‘बिघाडी’; ‘या’ तालुक्यात अद्याप निर्णय नाहीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.