Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar News: छत्रपती कारखाना वाचविण्याची अजित पवारांना साद;बारामतीत नेमकं चाललयं काय?

बिनविरोध होण्याची शक्यताही कमीच नुकत्याच झालेल्या ऊस गळीत हंगामात छत्रपती कारखान्याचे ऊस गाळप फार कमी झाल्याने त्याचा आर्थिक फटका कारखान्यासह ऊस उत्पादक सभासदांना बसला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 20, 2025 | 11:02 AM
Ajit Pawar News: छत्रपती कारखाना वाचविण्याची अजित पवारांना साद;बारामतीत नेमकं चाललयं काय?
Follow Us
Close
Follow Us:

अमोल तोरणे, बारामती:  बारामतील नागीनगर क्याल श्री छत्रपती नवराष्ट्र सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून सध्या अडचणीत असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणूक बिनविरोध अथवा एकतर्फी करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे. मात्र सध्याचे चित्र पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर आहे. कारखान्याची सध्याची स्थिती पाहता छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती कारखान्यासाठी तळमळ असणाऱ्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ५०० हून अधिक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखारी घेण्याची मुदत ५ मे पर्यंत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्याशी दिलजामाई करत त्यांना सलग पाच वर्ष छत्रपती कारखान्याची धुरा हाती देण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी ही घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक हे तीन नेते या निवडणुकीसाठी एकत्र येऊन इच्छुकांची चाचपणी ते करत आहेत.

Shaktipeeth Mahamarg: ‘शक्तीपीठ महामार्ग कुणाच्या फायद्यासाठी…’? हर्षवर्धन सपकाळांनी केली राज्य सरकारची पोलखोल

पृथ्वीराज जाचक अध्यक्षपदासाठी योग्य, सभासदांचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल मधून इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती गुरुवारी (दि २५) उपमुख्यमंत्री पवार व क्रीडा मंत्री भरणे हे घेणार आहेत. दरम्यान छत्रपती कारखान्याच्या भवितव्यासाठी कारखाना प्रशासनाचा मोठा अनुभव असलेले पृथ्वीराज जाचक हेच अध्यक्षपदासाठी योग्य ठरतील, असा विश्वास सभासदांना आहे. याच पार्श्वभूमीवर आपले राजकीय मतभेद विसरून अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांच्याशी दिलजमाई केली आहे.

बिनविरोध होण्याची शक्यताही कमीच नुकत्याच झालेल्या ऊस गळीत हंगामात छत्रपती कारखान्याचे ऊस गाळप फार कमी झाल्याने त्याचा आर्थिक फटका कारखान्यासह ऊस उत्पादक सभासदांना बसला आहे. त्यामुळे कारखान्याचा तोटा वाढला आहे. अनेक दिवसांपासून छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीत आहे. बारामती व इंदापूर तालुक्यातील ५४ गावांचा आधारवड असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात झाली होती. संपूर्ण राज्यात सहकारातील एक आदर्श कारखाना म्हणून पाहिल्या जाणाऱ्यार छत्रपतीर ची अवस्था सध्या अडचणीची आहे. निवडणूक बिनविरोध व्यवी, असे देखील अनेकांचे मत आहे. मात्र इच्छुकांची मोठी संख्या पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

Deenanath Mangeshkar Hospital: तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपामधील नेत्यांचा विरोध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडणूक बिनविरोध अथवा एकतर्फी करण्याच्या भूमिकेला भाजप नेते तानाजीराव थोरात व अविनाश मोटे यांनी विरोध करून निवडणूक पूर्ण ताकतीने समविचारी लोकांना बरोबर घेऊन लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर जिजामाता ऊस उत्पादक संघटनेचे प्रमुख सुनील काळे यांनी देखील निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विद्यमान संचालकांमध्ये अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह अनेक संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. अनेक नवे चेहरे या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

 

Web Title: Ajit pawar urged to save chhatrapati factory what is really going on in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
3

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार
4

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.