Photo Credit- Social Media 'शक्तीपीठ महामार्ग कुणाच्या फायद्यासाठी...'? हर्षवर्धन सपकाळांनी केली राज्य सरकारची पोलखोल
पुणे: “आम्ही शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात आहोत. नागपूर- गोवा शक्तीपीठ मार्गासाठी कोणतीही मागणी नाही. गोव्यात अशी कोणती शक्ती आहे की तिथे शक्तीपीठ मार्ग तयार केला जात आहे. हे भाजपचंच एक कारस्थान आहे. गोव्याच्या जवळ एक बंदर आहे. तिथून खरेद इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असते. केवळ अदानी समुहासाठी त्या बंदरापासून सेंट्रल इंडियापर्यंत एक रेडकार्पेट टाकण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा जागर सुरू आहे.” असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नवभारत, नवराष्ट्र वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील प्रस्तावित नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातून विरोध होत आहे. त्यासाठी अनेक संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली. तर काँग्रेसकडूनही या महामार्गाला विरोध केला जात आहे. अदानींच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घाटला जात असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नवराष्ट्र समुहाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारकडे लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यायला पैसे नाहीत, एसटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही. मग पैशांचा एवढा तुडवडा असताना,८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्याचा पीपीआर कोणीतरी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. त्याअनुषंगाने स्वत; मुख्यमंत्री त्याचा डीपीआर बनवत आहेत. अडानी आणि अंबानी यांना फायदा होण्यासाठीच सेंट्रल इंडियातून या बंदरापर्यंत शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचे कारस्थान रचले जात आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “इस्ट इंडिया कंपनी जेवढी चुकीच्या पद्धतीने कारभार करत होती. त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक रान मोकळ करून देण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा प्रपंच घातला आहे. गडचिरोलीला उत्खनन सुरू केलं आहे. सेंट्रल इंडियापासून यांचा पुढचा डाव छत्तीसगड आणि ओडिसापर्यत घेऊन जाण्याचा यांचा प्लॅन आहे, म्हणजेच एक मोठा कॉरिडॉर ओपन करून द्यायचा आहे.
जगभरात अडानींच्या माईन्सवर बंदी घालण्यात आली आहे. अडानींच्या कोणत्याही प्रकल्पाला ऑस्ट्रेलिया, युरोप, न्युझीलंडमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्या ठिकाणी असलेल्या यंत्रसामग्री काढून आणतील आणि आपला देश लुटतील. त्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्र लुटण्याचा डाव आखला जात आहे.”असंही सपकाळ यांनी म्हटलं आहे.
भुतालाही बाईचा नाद! फक्त महिलांना करायचा शिकार… चिमुकलींचे बालपण होते हरवत