
गैरप्रकाराला आळा; कागदी शिधापत्रिका इतिहासजमा
अकोला : धान्य वितरण प्रणालीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने शिधापत्रिकांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात ऑगस्ट २०२६ अखेर एकूण ४ लाख ६५ हजार ५५१ शिधापत्रिकाधारक असून, त्यापैकी १ लाख ३८ हजार ९४७ लाभार्थ्यांना ई-शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. नवीन शिधापत्रिकांसह जुन्या शिधापत्रिकांचेही ई-शिधापत्रिकेत रूपांतर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कागदी शिधापत्रिकेऐवजी ई-शिधापत्रिका सुविधा सुरू करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यातही तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकांचे १०० टक्के डिजीटलायझेशन पूर्ण झाले असून, आता भौतिक कार्डाऐवजी ई-शिधापत्रिका आणि ई-केवायसी प्रक्रियेला प्राधान्य दिले जात आहे. शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दरम्यान, निर्धारित मुदतीत ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ बंद होण्याची किंवा संबंधित सदस्याचे नाव शिधापत्रिकेतून वगळले जाण्याची शक्यता आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ‘मिशन सुधार’ अंतर्गत बनावट व अपात्र शिधापत्रिकाधारकांची नावे वगळण्यासाठीही कारवाई करण्यात येत आहे. नवीन भौतिक शिधापत्रिकांची छपाई बंद करण्यात आली असून, त्याऐवजी डिजीटल ई-शिधापत्रिकेचा वापर केला जात आहे. जिल्ह्यातील ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शिधापत्रिका आधारशी जोडण्यात आल्या आहेत.
शिधापत्रिकेचे प्रकार
आर्थिक उत्पन्न आणि निकषांनुसार रेशन कार्डचे (शिधापत्रिका) प्रामुख्याने चार ते पाच प्रकार आहेत. यामध्ये पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड / शुभ्र रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड व पाचवे प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड यांचा समावेश आहे. यामधील पिवळे रेशनकार्ड दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी असते. यामध्ये ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न खूप कमी आहे.
e-KYC करणे गरजेचे
गणपती आणि नवरात्री हे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सणासुदीच्या दिवशी रेशन दुकानातून स्वस्त धान्य दिले जाते. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरु केलेला आनंदाचा शिधा देखील रेशनकार्ड धारकांना दिला जातो. त्यासाठी तुमचं रेशनकार्ड सुरु असणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच नागरिकांना आपले रेशनकार्ड सुरु आहे की, बंद पडलयं हे माहिती नसते. त्यामुळे रेशन घेण्यावेळी त्यांना होल्डवर टाकलं आहे. आता अन्न पुरवठा विभागाने सांगितले की, कार्ड पुन्हा सुरु करायचे झाले e-KYC करावी लागणार आहे.
Ration Card e-KYC : रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC