Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

पातूर हा डोंगराळ आणि शेतीप्रधान तालुका असल्याने पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 29, 2026 | 12:12 PM
अकोल्यात सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हीट'ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर...

अकोल्यात सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हीट'ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर...

Follow Us
Follow Us:

अकोला : पावसाळ्याचे दिवस असूनही पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यासह पातूर तालुक्यात सध्या तीव्र उन्हाच्या चटक्यासह असह्य उकाड्‌याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आकाशात अधूनमधून ढग दाटून येत असले, तरी पाऊस पडण्याऐवजी उन्हाचा कडाका वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यातच नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’ चा दाहक अनुभव येत आहे.

यावर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने प्रदीचं दडी मारली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे तीन आठवडे उलटून गेले तरी अद्याप पातूर तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी हवेतील दमटपणा आणि उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. आकाशात ढगाळ वातावरण तयार होते, मात्र पाऊस न पडता उलट शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. त्यामुळे पातूर शहर व ग्रामीण भागातील नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

मागील पाच दिवसांपासून अकोला जिल्हा आणि पातूर परिसरातील तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावले आहे. गेल्या संपूर्ण आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात आली. या कालावधीत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

दमट हवेमुळे उकाड्यात भर

ढगाळ वातावरण असले तरी पथसाचा अभाव आणि हवेतील दमटपणामुळे वातावरण अधिक कोंदट जाणवत आहे. त्यामुळे सकाळपासूनच चामाच्या चारा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या वातावरणाने सर्दी, ताप यांसारख्या आजारांमध्ये वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात उकाडापासून तातडीने सुटका होण्याची चिन्हे नाहीत. पावसाच्या हजेरीने तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र, पाऊस लांबल्यास तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

पातूर हा डोंगराळ आणि शेतीप्रधान तालुका असल्याने पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होत असून सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. अशा वातावरणात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, हलके व सुती कपडे वापरणे आणि दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

पावसाळा संपत आला; भूजलपातळीची चिंता

ऑगस्टपासून दमदार पाऊस नसल्याने वावसाळ्याचा कालावधी संपत येत असताना भूजलपातळीबाबतही चिंता वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतक-याना उकाडधाचा सामना करावा लागत असून, पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यास त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवरही होण्याची शक्यता आहे.

Web Title: Akola feels the sting of october heat as early as september temperature hovers around 33 degrees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • akola news
  • Climate Change
  • Increase in Temperature
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
1

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
2

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

अकोल्यातील सर्व सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बाधित शेतकऱ्यांना आता सवलतींचा आधार
3

अकोल्यातील सर्व सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बाधित शेतकऱ्यांना आता सवलतींचा आधार

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
4

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.