Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी यात्रेतून अकोला एसटी विभागाला 2 कोटींचे उत्पन्न; 363 बसफेऱ्यांतून 4 लाख किमीचा केला प्रवास

अकोला विभागांतर्गत येणाऱ्या अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यांतील नऊ आगारांमधून पंढरपूर यात्रेसाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले होते. या सर्व आगारांमधून यात्रेसाठी एकूण ३६३ बसफेऱ्या चालविण्यात आल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2026 | 04:22 PM
आषाढी यात्रेतून एसटीला २ कोटींचे उत्पन्न

आषाढी यात्रेतून एसटीला २ कोटींचे उत्पन्न

Follow Us
Follow Us:

अकोला : पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी यात्रेनिमित्त अकोला विभागातील हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले. वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने विशेष नियोजन केले होते. वारकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अकोला एसटी विभागाच्या तिजोरीत २ कोटी ८१ लाख ६० हजार २२९ रुपयांची घवघवीत भर पडली आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना आकर्षित करण्यासोबतच त्यांच्या सुविधेसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. यामध्ये थेट बससेवेचा समावेश होता. एखाद्या गावातून एकाच वेळी ४४ किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास संबंधित गावातून थेट पंढरपूरपर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांनुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला आणि इतर पात्र घटकांना तिकीट दरात विशेष सवलत देण्यात आली.

अकोला विभागांतर्गत येणाऱ्या अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यांतील नऊ आगारांमधून पंढरपूर यात्रेसाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले होते. या सर्व आगारांमधून यात्रेसाठी एकूण ३६३ बसफेऱ्या चालविण्यात आल्या. या बसगाड्यांनी प्रवासादरम्यान एकूण ४ लाख ५६ हजार किलोमीटर अंतर पार केले.

MSRTC Smart Card : 1 सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य; पात्र लाभार्थ्यांना नोंदणीचे आवाहन

अहोरात्र परिश्रमांमुळे हे नियोजन यशस्वी

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर यात्रेसाठी वारकऱ्यांनी एसटीवर दाखवलेला विश्वास आणि सर्व आगार प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्या अहोरात्र परिश्रमांमुळे हे नियोजन यशस्वी झाले आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश मिळाले.

– स्मिता सुतवणे, विभाग नियंत्रक

एसटी प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 12 ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल 1 कोटी 1 लाख 73 हजार 838 प्रवाशांनी एनसी एमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी 64 लाख 91 हजार 65 कार्डे सक्रिय झाली आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Web Title: Akola st division earns 2 crore from ashadhi yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Ashadhi Yatra
  • Maharashtra ST Buses
  • ST News

संबंधित बातम्या

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय
1

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.