Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग

अल्पावधीत तांत्रिकदृष्ट्या योग्य नियोजन करून खरिपातील कांदा लागवडीचा प्रयोग प्रत्यक्ष शेतपातळीवर आणण्यात आला आहे. खरिपातील कांदा लागवडीचे तंत्रज्ञान, रोपांची वाढ, लागवडीचे नियोजन आणि उत्पादनक्षमता यांचा या प्रयोगातून अभ्यास केला जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2026 | 04:18 PM
बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग

Follow Us
Follow Us:

अकोला : वाढता उत्पादन खर्च, बदलते हवामान आणि पिकांच्या उत्पादनातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढीचे नवे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, वणी रंभापूर येथे प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर खरिपातील कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग राबवण्यात आला आहे.

या प्रयोगात कांद्याची रोपवाटिका तयार करून त्यानंतर खरिपात रोपांची लागवड करण्यात आली. प्रारंभी ३ ते ५ हेक्टर क्षेत्रावर हा प्रयोग करण्यात आला असून, उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर अनुभवता यावे, यासाठी सुमारे १०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. हा प्रयोग कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य बीजोत्पादन अधिकारी डॉ. शिवाजीराव नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे.

अल्पावधीत तांत्रिकदृष्ट्या योग्य नियोजन करून खरिपातील कांदा लागवडीचा प्रयोग प्रत्यक्ष शेतपातळीवर आणण्यात आला आहे. खरिपातील कांदा लागवडीचे तंत्रज्ञान, रोपांची वाढ, लागवडीचे नियोजन आणि उत्पादनक्षमता यांचा या प्रयोगातून अभ्यास केला जाणार आहे. प्रयोगातून मिळणारे निष्कर्ष भविष्यात शेतकऱ्यांना खरिपातील कांदा उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.

नागूपर शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस; सुरुवातीच्या काही तासांतच…

डॉ. शिवाजीराव नागपुरे यांनी सांगितले की, खरिपातील कांदा लागवडीचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास परिसरातील शेतकऱ्यांसाठी तो निश्चितच दिशादर्शक ठरेल. आधुनिक आणि तांत्रिक पद्धतींचा वापर करून उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

सोयाबीन, तूर, मूग, उडदासह विविध पिकांची लागवड

वणी रंभापूर प्रक्षेत्रात खरिपातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि तीळ आदी पिकांचीही पेरणी करण्यात आली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास या पिकांच्या उत्पादनात वाढ होऊन उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येईल, असा विश्वास डॉ. नागपुरे यांनी व्यक्त केला.

कांदा लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास…

वणी रंभापूर येथील प्रक्षेत्र शेतीसाठी विकसित करून विविध पिकांच्या माध्यमातून उत्पादनवाढीचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषत: खरिपातील कांदा लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास त्यातून मिळणाऱ्या अनुभवाच्या आधारे भविष्यात मोठ्या क्षेत्रावर हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविता येण्याची शक्यता आहे.

Web Title: Challenges facing farmers have increased due to changing weather conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • akola news
  • Farmers Issue

संबंधित बातम्या

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल
1

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत
2

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण
3

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.