Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. बालकांची सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2026 | 12:06 PM
अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

Follow Us
Follow Us:

अकोला : महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाने जिल्ह्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बाल संरक्षण व्यवस्थेची अंमलबजावणी आणि बालगृहातील बालकांच्या परिस्थितीचा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील तब्बल 329 शाळांमध्ये एकही महिला शिक्षिका नसल्याची गंभीर बाब समोर आली. आयोगाने याची दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. बालकांची सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिले. आयोगाने बालगृहातील सोयी सुविधांची पाहणी तसेच सुनावणी घेऊन विविध यंत्रणांच्या कामगिरीचा आढावा घेतला. बैठकीस आयोगाचे सदस्य अतुल देसाई, प्रवीण भुजाडे, गीतांजली बुटी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश दीनानाथ दाभाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Mantralaya Staff Relieved Decision : मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

दरम्यान, गेल्या तीन वर्षांत बाल संरक्षणासाठी कार्यरत यंत्रणांनी केलेल्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. पीडित बालकांच्या समस्या कायद्याच्या चौकटीत राहून बाल संरक्षणाच्या कामातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, असे निर्देश आयोगाने दिले.

सध्या रोटेशन पद्धतीने भेट

महिला शिक्षिका नसलेल्या शाळांमध्ये नजीकच्या शाळेतील शिक्षिका दर शनिवारी रोटेशन पद्धतीने भेट देत असून, विद्यार्थिनींशी संवाद साधत असल्याची माहिती शिक्षण विभागाने बैठकीत दिली.

सीबीएसईच्या त्रि-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

CBSE च्या त्रि-भाषा धोरणाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा देण्याबाबत विचार करण्यास सांगितले. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सध्याच्या व्यवस्थेनुसार या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन इयत्ता १० वी मध्ये तिसऱ्या भाषेची परीक्षा द्यावी लागू शकते. न्यायालयाने या मुद्द्यावर केंद्राची बाजू ऐकून घेतली असून, पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे.

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Web Title: No female teachers in 329 schools across akola district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • akola news
  • Education Department

संबंधित बातम्या

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत
1

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत

लहान मुलांच्या पाठीवरील ‘ओझे’ अखेर उतरणार! राज्य सरकारचा शाळांना कडक इशारा; नियम मोडल्यास कारवाई?
2

लहान मुलांच्या पाठीवरील ‘ओझे’ अखेर उतरणार! राज्य सरकारचा शाळांना कडक इशारा; नियम मोडल्यास कारवाई?

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर
3

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.