Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पात्र वारसांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रस्ताव तपासले जातात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2026 | 11:19 AM
अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत

Follow Us
Follow Us:

अकोला : कर्जबाजारीपणा, नापिकी, वाढता लागवड खर्च आणि उत्पन्नातील तफावत यांसारख्या विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. अकोला जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट 2026 या आठ महिन्यात तब्बल 105 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी 48 प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीस पात्र ठरली असून, 34 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. तर 23 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

शेतकऱ्यांना सातत्याने विविध संकटांना सामोरे जावे लागते. सततची नापिकी, सावकार व बँकांचे कर्ज, वाढता लागवड खर्च आणि शेतीमालाला मिळणारे अपुरे उत्पन्न यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. या परिस्थितीत नैराश्यातून काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अशा घटना घडत आहेत.

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले

दरम्यान, अकोला जिल्ह्यात १ जानेवारी २००१ ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान एकूण ३ हजार ३९७शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २ हजार ५१ शासकीय आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या आहेत. तर १ हजार ३२३ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र ठरल्या आहेत. तर आत्महत्येची एकूण २३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या अकोला तालुक्यात घडल्या असून तीन वर्षांची ही संख्या ७७९ इतकी आहे.
आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पात्र वारसांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रस्ताव तपासले जातात. समितीच्या बैठकीत शासनाच्या निकषांनुसार, प्रत्येक प्रकरणाची छाननी करून पात्रता निश्चित केली जाते. पात्र ठरलेल्या कुटुंबांना त्यानंतर शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

चालू वर्षाची तालुकानिहाय स्थिती

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून शासनाच्या निकषांनुसार त्यांची पात्रता निश्चित केली जाते. निकषात बसणाऱ्या पात्र प्रकरणांमधील मृत शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात येते, तर अपात्र ठरलेल्या प्रकरणांचा पुनर्विलोकन अर्ज आल्यास त्यावरही नियमानुसार पुनर्विचार केला जातो.

– गजेंद्र मालठाणे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

Web Title: Highest number of farmer suicides in akola taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • akola news
  • Farmer Suicide

संबंधित बातम्या

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल
1

अकोला जिल्ह्यातील 329 शाळांमध्ये शिक्षिकाच नाही; महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण
2

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर
3

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.