
याद्यांचा पेच, नाव शोधताना दमछाक; मतदारांमध्ये संतापाचे वातावरण (फोटो सौजन्य-Gemini)
अकोला : १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असतानाच, दुसरीकडे मतदार याद्यांच्या घोळामुळे मतदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मतदार चिठ्चांचे वाटप सुरू झाले असले तरी, शेकडो मतदारांची नावे शोधताना प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह खुद्द मतदारांचीही मोठी कसोटी लागत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
वास्तविक, विधानसभा मतदार याद्याच महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या निवडणुकीसाठी प्रभागांनुसार फोडून (विभाजित करून) वापरल्या जात आहेत. मात्र, ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सदोष झाल्याचा आरोप होत आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात किंवा मतदान केंद्रांवर विखुरली गेल्याने मतदारांना आपले नाव नेमके कोणत्या यादीत आहे, हे शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक ठिकाणी जुन्या वॉर्डातील नावे नवीन वॉर्ड रचनेत योग्यरित्या समाविष्ट न झाल्याने गोंधळ अधिक वाढला आहे.
मतदानाची टक्केवारी वाहावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हे कर्मचारी घरोघरी जाऊन चिठ्यांचे वाटप करत आहेत. मात्र, याद्यांमधील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे विसंगतीमुळे या कर्मचाऱ्यांनाही लागत आहे. नाव यादीत नाही किवा दुसऱ्याच केंद्रावर नाव गेले अशा तक्रारी समोर येत आहेत. निवडणूक आयोगाकडून जनजागृती केली जात असली तरी, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जर मतदारांना नाव सापडले नाही, तर त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासकीय नियोजनातील या त्रुटीमुळे उमेदवारांच्या गोटातही चिंतेचे वातावरण असून, कार्यकर्ते आता स्वतःहून मतदारांची नावे शोधून देण्यासाठी धावपळ करत आहेत. प्रशासनाने या तांत्रिक अडचणींवर तातडीने मार्ग काढून मतदारांना सुलभरित्या नाव शोधण्यासाठी हेल्प डेस्क किंवा ऑनलाइन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पूर्वी उमेदवारांमार्फत घरोघरी मतदान चिठ्ठया पोहोचवल्या जात होते. ज्यामुळे मतदारांना आपला केंद्र क्रमांक आणि खोली क्रमांक सहज समजत असे. मात्र, पारदर्शकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाने ही जबाबदारी आता अधिकृत कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे.
अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलेल्या टपाल मतपत्रिकांबाचत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मतपत्रिकांवर उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे नाव छापण्यात आले. मात्र, त्या पक्षाचे अधिकृत चिन्हच गायब असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मतपत्रिकेवर केवळ उमेदवाराचे नाव आणि त्याच्या पक्षाचा उल्लेख आहे. पण, मतदाराला ओळख पटवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले पक्षचिन्ह त्यावर दिसत नाही. चिन्ह नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी मतदान करताना अडचण येत असल्याची भावना व्यक्त केली. विशेषतः अपक्ष उमेदवार आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत चिन्ह नसल्याने मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे.