Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात विनानंबर टँकरचा अक्षरश: सुळसुळाट; महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

वाहनांवर नोंदणी क्रमांक नसल्याने त्यांची मालकी आणि ओळख पटविणे कठीण होते. वाहतूक नियमांनुसार प्रत्येक वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस स्पष्ट नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून टैंकर शहरात धावत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 21, 2026 | 01:42 PM
अकोल्यात विनानंबर टँकरचा अक्षरश: सुळसुळाट; महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

अकोल्यात विनानंबर टँकरचा अक्षरश: सुळसुळाट; महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:
  • अकोल्यात विनानंबर पाण्याच्या टँकरचा सुळसुळाट
  • महापालिकेचे १० टँकर; काही वाहनांवर नंबर प्लेटच नाही
  • महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक नियमांचा भंग
अकोला : पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणारे महानगरपालिकेचे अनेक पाण्याचे टँकर विनानंबर प्लेट रस्त्यांवर धावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहनांवर नोंदणी क्रमांक नसतानाही हे टँकर शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांतून बिनधास्तपणे फिरत आहेत. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.

शहरातील अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरची मागणी वाढली आहे. नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने शहरात पाणीपुरवठ्यासाठी १० टँकर उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, अकोला महानगरपालिकेचे स्टिकर लावलेले काही टँकर तसेच खाजगी टँकर विनानंबर प्लेट फिरत असल्याचे दिसून येत आहे.

वाहनांवर नोंदणी क्रमांक नसल्याने त्यांची मालकी आणि ओळख पटविणे कठीण होते. वाहतूक नियमांनुसार प्रत्येक वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस स्पष्ट नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून टैंकर शहरात धावत आहेत. अशा वाहनांमुळे अपघात घडल्यास संबंधित वाहनाचा शोध घेणेही पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. सामान्य नागरिकांच्या वाहनांवर नंबर प्लेट नसल्यास वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

मग महानगरपालिकेचे टँकर विनानंबर प्लेट फिरत असतानाही संबंधित विभाग कारवाई का करीत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील अशा सर्व टँकरची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टँकरवरही संबंधित विभागाने कारवाई करावी

सामान्य नागरिकांच्या वाहनाला नंबर प्लेट नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मग पाणीपुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेच्या विनानंबर प्लेट टँकरवरही संबंधित विभागाने कारवाई करायला हवी.

FAQ

प्रश्न १ : अकोल्यात कोणता प्रकार समोर आला आहे?
उत्तर : महानगरपालिकेचे तसेच काही खासगी पाण्याचे टँकर विनानंबर प्लेट रस्त्यांवर धावत असल्याचे समोर आले आहे.

प्रश्न २ : विनानंबर टँकर कुठे फिरत आहेत?
उत्तर : हे टँकर शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळांतूनही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.

प्रश्न ३ : अकोला महापालिकेने किती टँकर उपलब्ध करून दिले आहेत?
उत्तर : नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात १० पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत.

Web Title: Many unnumbered tanker in akola nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • akola news
  • Water Issue

संबंधित बातम्या

अकोल्यात विनापरवानगी बोरवेल खोदकामाचा धडाका सुरुच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
1

अकोल्यात विनापरवानगी बोरवेल खोदकामाचा धडाका सुरुच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा
2

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा

अकोल्यातील उमा प्रकल्पात केवळ 3 टक्के जलसाठा; अनेक जलप्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा
3

अकोल्यातील उमा प्रकल्पात केवळ 3 टक्के जलसाठा; अनेक जलप्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

अकोल्यात दहा महिन्यांत 71 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; खरीप हंगामातील 62 जणांनी संपवली जीवनयात्रा
4

अकोल्यात दहा महिन्यांत 71 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; खरीप हंगामातील 62 जणांनी संपवली जीवनयात्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.