
२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा
बालवडकर यांनी म्हटले आहे की, उपलब्ध आकडेवारीनुसार २०२५ मध्ये पाणीगळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचा महापालिकेचा दावा होता. मात्र, २०२६ मध्येही सुमारे ३२ टक्के पाणी गळतीतून वाया जात असल्याचे अहवाल समोर आले आहे. या गळतीमुळे दररोज अंदाजे ५२२ दशलक्ष लिटर, तर वर्षाला तब्बल ६ ते ७ टीएमसी पाणी वाया जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
१,६०० कोटींच्या खर्चाचा हिशेब द्या
२४x७ पाणीपुरवठा योजनेवर १,६०० कोटी रुपये खर्च केल्यानंतरही पाणीगळतीचे प्रमाण मोठे असेल, तर या योजनेचा पुणेकरांना नेमका काय फायदा झाला, असा सवाल बालवडकर यांनी उपस्थित केला. २४x७ पाणीपुरवठ्याचे आश्वासन, कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि तरीही वितरण व्यवस्थेतील पाणीगळती कायम असल्याने योजनेचे नियोजन, अंमलबजावणी आणि खर्चाची जबाबदारी कोणाची, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असत्या, तर पुणेकरांवर पाणीकपात करण्याची वेळ आली असती का, असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे. पाणीकपातीचा निर्णय घेण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी काय केले, याचा हिशेब पुणेकरांना द्यावा, अशी टीका त्यांनी केली.
बालवडकर यांच्या प्रमुख मागण्या
Ans: पुणे शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत सुमारे ३२ टक्के पाणीगळती होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दररोज अंदाजे ५२२ दशलक्ष लिटर, तर वर्षाला सुमारे ६ ते ७ टीएमसी पाणी वाया जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
Ans: पुणे शहरातील २४x७ पाणीपुरवठा योजनेवर तब्बल १,६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, एवढा खर्च होऊनही पाणीगळती कायम असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
Ans: पाणीगळतीचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट, १,६०० कोटींच्या खर्चाचा सविस्तर लेखाजोखा, ५२२ दशलक्ष लिटर पाणीगळतीचा प्रभागनिहाय अहवाल आणि पाणीगळती रोखण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.