मुंबईकरांवर सध्या पाणीकपातीचं सावट येताना दिसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील जलशद्धीकरणासाठी केंद्रातील 100 किलोव्हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
शहरातील सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात आज मीरा-भाईंदरमधील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. महानगरपालिकेविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी तीव्र निदर्शने केली.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरत आले असून, पूर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट रोजी येलदरी धरणातून येथील वीज निर्मिती केंद्राच्या दोन जनित्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.