Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात दोन ठिकाणी होणार थ्रोम्बोलिसिस सेंटर; हृदयविकाराच्या रुग्णांना दिलासा मिळणार

हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे आणि गंभीर गुंतागुंत टाळणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. दोन्ही केंद्रांसाठी एकूण १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2026 | 03:04 PM
अकोल्यात दोन ठिकाणी होणार थ्रोम्बोलिसिस सेंटर; हृदयविकाराच्या रुग्णांना दिलासा मिळणार

अकोल्यात दोन ठिकाणी होणार थ्रोम्बोलिसिस सेंटर; हृदयविकाराच्या रुग्णांना दिलासा मिळणार

Follow Us
Follow Us:
  • अकोल्यात दोन ठिकाणी होणार थ्रोम्बोलिसिस सेंटर
  • प्रत्येकी तीन खाटांची स्वतंत्र व्यवस्था
  • दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी जागतिक थ्रोम्बोसिस दिन
अकोला : जिल्ह्यातील हृदयविकाराच्या रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे थ्रोम्बोलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. या दोन्ही केंद्रांसाठी प्रत्येकी तीन खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही केंद्रे लवकरच नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित होणार असून, उपसंचालक, आरोग्य सेवा तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कारवाई सुरू आहे.

हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे आणि गंभीर गुंतागुंत टाळणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. दोन्ही केंद्रांसाठी एकूण १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये दोन फिजिशियन, चार वैद्यकीय अधिकारी आणि सात परिचारिकांचा समावेश आहे. प्रशिक्षित वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यकतेनुसार तातडीचे उपचार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

Akola News : हप्ता थकला म्हणून फायनान्सवाले थेट घरी; पत्नीचा फोटो काढल्याच्या आरोपाने खळबळ

दरम्यान, दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी जागतिक थ्रोम्बोसिस दिन साजरा केला जातो. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याचा धोका कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, धूम्रपान टाळणे आणि दीर्घकाळ एकाच जागी बसून न राहता अधूनमधून हालचाल करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

आपत्कालीन उपचारांना बळ

रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी विशिष्ट औषधांच्या साहाय्याने ही गुठळी विरघळविण्याच्या उपचारपद्धतीला थ्रोम्बोलिसिस म्हणतात. हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे होणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या पक्षाघातामध्ये (स्ट्रोक) योग्य रुग्णाची निवड करून हे उपचार केले जाऊ शकतात. या उपचारांसाठी वेळेला विशेष महत्त्व असते. अकोला आणि मूर्तिजापूर येथे ही केंद्रे सुरू झाल्यानंतर संबंधित रुग्णांना स्थानिक पातळीवर तातडीचे उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

Justice K Chandru on Collegium System : न्यायमूर्तींच्या नियुक्तीत ‘भगवेकरण’!; माजी न्यायमूर्ती के. चंद्रूंचा धक्कादायक गौप्यस्फोट

Web Title: Thrombolysis centers to be set up at two locations in akola nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.