Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibag Ashadhi Ekadashi Wari: अलिबागमध्ये ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ संकल्पनेतून भव्य दिंडी; पालखी सोहळ्यात विठ्ठलनामाचा गजर

अलिबाग येथे आषाढी एकादशीनिमित्त "एक दिवस तरी वारी अनुभवावी" या संकल्पनेतून अलिबाग ते वरसोली भव्य पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 23, 2026 | 09:38 PM
अलिबागमध्ये 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' संकल्पनेतून भव्य दिंडी

अलिबागमध्ये 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' संकल्पनेतून भव्य दिंडी

Follow Us
Follow Us:
  • अलिबागमध्ये ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ संकल्पनेतून भव्य दिंडी
  • पालखी सोहळ्यात विठ्ठलनामाचा गजर!
अलिबाग, दि. २३ जुलै २०२६: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, लायन्स क्लब ऑफ अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “एक दिवस तरी वारी अनुभवावी” या संकल्पनेतून भव्य पायी दिंडी व भक्तिमय वारीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७.०० वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, अलिबाग येथून प्रारंभ झालेली ही वारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वरसोली येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली.

या वारीमध्ये रामनाथ मराठी शाळेतील सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” च्या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी, विविध बचत गटांतील महिला, नागरिक, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे कर्मचारी तसेच अनेक वारकरी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या उपक्रमाला धर्मादाय आयुक्त राजेश इंगोले, निरीक्षक सुनील साळुंखे, डॉ. विजय कोकणे, जागृती फाउंडेशनच्या जागृती बेलेकर, लायन्स क्लबचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकरी भक्तांसाठी जागृती फाउंडेशनच्या जागृती बेलेकर यांच्या वतीने चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक साहित्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली. याशिवाय अनेक भक्तांना कुर्ते व सदरे वाटप करून सेवाभावाचा आदर्श घालून देण्यात आला.

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी भेट! दादर-पंढरपूर दरम्यान सुटणार २ विशेष गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव/चव्हाण, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम मायाप्पा हुलवान, उपाध्यक्ष श्री. महेंद्र पाटील व खजिनदार डॉ. नितीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे, संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव/चव्हाण यांनी स्वतः अलिबाग ते वरसोली असा संपूर्ण पालखी सोहळा खांद्यावर पालखी घेत पायी पूर्ण केला.

विठ्ठलभक्तीचा हा अविस्मरणीय अनुभव त्यांच्या जीवनातील अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी क्षण ठरला. त्यांच्या या भक्तिभावाने उपस्थित वारकरी आणि नागरिकांनाही प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माथाडी कामगार संघटना, सर्व स्वयंसेवक, सामाजिक संस्था, मान्यवर, रामनाथ मराठी शाळेचे विद्यार्थी, महिला बचत गट, लायन्स क्लब ऑफ अलिबाग, जागृती फाउंडेशन तसेच सर्व वारकरी भक्तांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

“एक दिवस तरी वारी अनुभवावी” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत भक्ती, सेवा, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

तेजोत्सवात न्हाले विठ्ठल मंदिर! संपू्र्ण परिसर झाला प्रकाशमय; पंढरीचे आध्यात्मिक वैभव खुलले

Web Title: Alibag to varsoli ashadhi ekadashi wari dindi sohala 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Alibag
  • Ashadhi Wari

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.