Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आळंदीच्या निकालाची नागरिकांमध्ये उत्सुकता, कोण होणार नगराध्यक्ष? मतमोजणीकडे सर्वाचे लक्ष

आळंदी शहराच्या राजकीय इतिहासात उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या (दि. २१) होणाऱ्या मतमोजणीतून शहराचा नवा नगराध्यक्ष कोण होणार, तसेच प्रभागनिहाय विकासाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 20, 2025 | 06:50 PM
आळंदीच्या निकालाची नागरिकांमध्ये उत्सुकता, कोण होणार नगराध्यक्ष? मतमोजणीकडे सर्वाचे लक्ष

आळंदीच्या निकालाची नागरिकांमध्ये उत्सुकता, कोण होणार नगराध्यक्ष? मतमोजणीकडे सर्वाचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • आळंदीच्या निकालाची नागरिकांमध्ये उत्सुकता
  • कोण होणार नगराध्यक्ष?
  • मतमोजणीकडे सर्वाचे लक्ष
आळंदी/बद्रीनारायण घुगे : आळंदी शहराच्या राजकीय इतिहासात उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या (दि. २१) होणाऱ्या मतमोजणीतून शहराचा नवा नगराध्यक्ष कोण होणार, तसेच प्रभागनिहाय विकासाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला होणार आहे. त्यामुळे केवळ उमेदवारच नव्हे, तर संपूर्ण शहराचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागले आहे. २ डिसेंबरला मतदारांनी आपला कौल मतदानयंत्रात बंद केला होता. विकास, बदल, नेतृत्व आणि विश्वास या मुद्द्यांवर मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे उद्या स्पष्ट होणार आहे. ही निवडणूक केवळ एक राजकीय प्रक्रिया नसून, शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा कौल म्हणून पाहिली जात आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच शहराच्या मूलभूत सुविधांबाबत कोण प्रभावी भूमिका बजावू शकतो, याचा गांभीर्याने विचार मतदारांनी केल्याचे दिसून येते. शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. अनेक ठिकाणी अपूर्ण कामे व रखडलेले प्रकल्प, तर काही भागांत झालेली विकासकामे हेच प्रचाराचे मुख्य मुद्दे ठरले. ‘काम केले की नाही’ या एकाच प्रश्नावर अनेक उमेदवारांची राजकीय परीक्षा झाली आहे.

तरुण नेतृत्वाचा उदय

या निवडणुकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुण उमेदवारांचे मैदानात उतरणे. अनेक तरुण प्रथमच नगरपालिकेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, त्यांनी ‘बदल’, ‘नवीन विचार’ आणि ‘पारदर्शक कारभार’ या मुद्द्यांवर प्रचार केला. तरुण मतदारांमध्येही या उमेदवारांविषयी विशेष उत्सुकता दिसून आली. उद्याचा निकाल नव्या नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करतो की अनुभवी चेहऱ्यांनाच पुन्हा संधी देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

मतमोजणी उद्या (दि. २१) सकाळी पार पडणार असून, सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकाल जाहीर होताच शहराच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, काही ठिकाणी विजयाचा आत्मविश्वास तर काही ठिकाणी चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

Web Title: All eyes are on the results of the alandi municipal council elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • alandi
  • Election News
  • Election Result

संबंधित बातम्या

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?
1

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.