Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara ZP : विषय समितींच्या सर्व सदस्यांच्या निवडी बिनविरोध; सत्ताधारी-विरोधकांत रंगला कलगीतुरा

सातारा जिल्हा परिषदेला अनेक वर्षांची चांगली परंपरा आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पारदर्शी व शिस्तबध्द पध्तीने कामकाज करु.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2026 | 12:16 PM
विषय समितींच्या सर्व सदस्यांच्या निवडी बिनविरोध

विषय समितींच्या सर्व सदस्यांच्या निवडी बिनविरोध

Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितींसह, दहा विषय समितींच्या सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. या नंतर विरोधकांनी नूतन सदस्यांसह, अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदन ठरावाच्या अनुंषगाने निवड प्रक्रियेविषयी मुद्दे उपस्थित केल्याने या अभिनंदन ठरावादरम्यान सत्ताधारी व विरोधकांत कलगीतुरा रंगला.

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे होत्या. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले हे या सभेचे सचिव होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण व अर्थसमिती सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, कृषी व पशूसंर्वधन सभापती लता कर्णे यांच्यासह भाजपचे, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर मित्र पक्षाचे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर स्थायी समिती व विषय समितींसाठी अर्ज भरलेल्या सदस्यांची माहिती देण्यात आली. त्यानंतर अर्ज छाननी व माघारीच्या प्रक्रियेनंतर ८३ जागांसाठी ८३ अर्ज आल्याने सर्वच्या सर्व दहा विषय समिती सदस्यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, त्याचवेळी विरोधी गटातील वृषाली चव्हाण यांनी आरोग्य समितीतून व सुरज पाटील यांनी अर्थ समितीतून माघार घेण्यासाठी अर्ज दिला. एकूणच, दहा विषय समिती सदस्यांची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, सातारा जिल्हा परिषदेला अनेक वर्षांची चांगली परंपरा आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पारदर्शी व शिस्तबध्द पध्तीने कामकाज करु. तसेच, यापूर्वी निवडणूकीत झालेले मतभेद आता बाजूला ठेवून जिल्हा परिषदेचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन यापुढे जिल्हा परिषदेचे कामकाज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील चारही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला भरघोस निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असून झेडपीच्या सर्वच सदस्यांनी आपआपल्या नेतेमंडळींकडून जिल्हा परिषदेला चांगला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्थायी समितींसह, सर्व दहाच्या दहा विषय समितींच्या सदस्यांची निवडी बिनविरोध पार पडल्यानंतर नूतन सदस्य व पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यासाठी विरोधी गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई उभे राहिले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या भाषणाचा आधार घेत निवडणूकीत घडलेल्या घडामोडींचा उल्लेख सुरु केल्यानंतर उपाध्यक्ष राजू भोसले व सदस्य दिलीप बाबर यांनी मध्येच हस्तक्षेप करत त्यांना त्या विषयावर बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या विरोधी सदस्यांनी अनिल देसाईंच्या बाजूने री ओढत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व गटनेते उदय कबुले यांनी त्यामध्ये मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला.

त्यानंतर राष्ट्रवादीचे फलटणचे जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर हे अभिनंदनाचा ठराव मांडत असताना त्यांनीही आपल्या भाषणात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडींसह, सभापती निवडीत झालेल्या घडामोडींचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केल्यानंतर उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले यांनी मध्येच हस्तक्षेप करत आजच्या सभेच्या निवडीच्या अनुंषगाने बोला, असे सांगत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, बनकर यांनी आपला विषय तसाच पुढे चालू ठेवल्याने उपाध्यक्ष भोसले यांनी मध्येच हस्तक्षेप करत आजची सभा संपली असल्याचे जाहीर करत सर्वांचे आभार मानत सभा आटोपती घेतली.

Web Title: All members of the satara zp subject committees elected unopposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
4

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.