Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: नालेसफाई अपूर्णच; मद्यपींना जुंपले? पालिकेच्या एस विभागातील काही ठिकाणी दारुड्यांच्या भरवशावर

विक्रोळी आणि कांजूरमार्ग येथील काही नाले अद्यापही प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि गाळाने पूर्णपणे चोक-अप झाले आहे. यापैकी काही नाले साफ करण्यासाठी पिवळ्या पोकलेनसह नाल्यामध्ये स्थानिक व्यक्तीला कोणत्याही सुरक्षेविना थेट कचऱ्याच्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या ढिगाऱ्यात उतरवले जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 11:20 AM
नालेसफाई अपूर्णच; मद्यपींना जुंपले? पालिकेच्या एस विभागातील काही ठिकाणी दारुड्यांच्या भरवशावर

नालेसफाई अपूर्णच; मद्यपींना जुंपले? पालिकेच्या एस विभागातील काही ठिकाणी दारुड्यांच्या भरवशावर

Follow Us
Follow Us:

यंदा मुंबई महानगरपालिका हद्दीतील नालेसफाई ११० टक्क्यांहून अधिक झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवरील परिस्थितीत पालिकेचे हे दावे किती पोकळ आहेत, याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईच्या एस विभागात नालेसफाईची १० जूनची अधिकृत डेडलाईन उलटून गेल्यानंतरही नाल्यांची दुरवस्था कायम आहे.(फोटो सौजन्य – AI)

Monsoon Update : 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार? मुंबईत उकाडा कायम, मराठवाडा-विदर्भात उष्णतेचा इशारा

धक्कादायक बाब म्हणजे, या विभागांमध्ये काही स्थानिक दारुड्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या माध्यमातून नालेसफाईचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे केवळ बिले लाटण्यासाठीच कंत्राटदाराने हा ‘जुगाड’ केला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. विक्रोळी आणि कांजूरमार्ग येथील काही नाले अद्यापही प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि गाळाने पूर्णपणे चोक-अप झाले आहे. यापैकी काही नाले साफ करण्यासाठी पिवळ्या पोकलेनसह नाल्यामध्ये स्थानिक व्यक्तीला कोणत्याही सुरक्षेविना थेट कचऱ्याच्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या ढिगाऱ्यात उतरवले जात आहे. कामगारांना सुरक्षा देणे बंधनकारक असताना, केवळ कामाचे बिल लाटण्यासाठी कंत्राटदाराने स्थानिक दारुड्यांना नाल्यात उतरवून हा जीवघेणा जुगाड केला आहे.

पाऊस तोंडावर तरी बोंबाबोंब!

संपूर्ण उन्हाळा निघून गेला, पण इथे नालेसफाई करण्यासाठी पालिका किवा कंत्राटदाराचे कोणीही आले नाही. आता पाऊस अगदी तोंडावर आला आहे तोच यांनी घाईघाईने नालेसफाईचे काम करायला सुरुवात केली आहे.सर्वात गभीर बाब म्हणजे, या अत्यंत महत्त्वाच्या कामादरम्यान घटनास्थळावर पालिकेचा एकही अधिकृत कर्मचारी प्रत्यक्षात उपस्थित नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक मेहबूब यांनी दिली. दुसरीकडे, घटनास्थळी नालेसफाईचे काम करून घेणाऱ्या एका व्यक्तीने आपण ‘पालिकेचे कर्मचारी’ असल्याचा दावा केला.

एकीकडे पालिकेचे वरिष्ठ अधिकारी ११० टक्के काम झाल्याचे कागदी घोडे नाचवत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून, कोणतीही यंत्रणा नसताना कंत्राटदार दारुड्यांच्या मदतीने नालेसफाईची मलमपट्टी करत आहेत. कंत्राटदारांचे खिसे भरण्याच्या या ‘जुगाडामुळे’ यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना पुन्हा एकदा तुंबलेल्या मुंबईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरातील प्रतिक्रिया तरुणी आईशा झा या तरुणीने दिली.

Bhandup News: पाण्यासाठी भांडुपकरांचा संघर्ष! कमी दाबामुळे उंच भागातील वस्त्या तहानलेल्या, नागरिक हैराण

66 माझ्या विभागाल फायद्यासाठी ८० ते ८५ टक्के नालेसफाई झाली आहे. मात्र, कंत्राटदार आपल्या स्थानिक दारुड्यांचा वापर करून त्यांना नाल्यात उतरवत असल्याची मला अजिबात कल्पना नाही, असे राजेश सोनवलकर म्हणाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Allegations of involving alcoholics in cleaning operations in some areas of bmcs s ward

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • Gutter cleaning
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
1

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक! राज्यातील अनेक भागांत बरसला, २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान कुठे-कुठे बरसणार?
2

महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक! राज्यातील अनेक भागांत बरसला, २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान कुठे-कुठे बरसणार?

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट
3

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.