उड्डाणपूल थेट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार असल्याने, दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना थेट आणि विनाअडथळा मार्ग उपलब्ध होणार आहे.
घुमटातील गळतीची कायमस्वरूपी दुरुस्ती सुरू असून संपूर्ण संवर्धन प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उघड झालेल्या या गळतीनंतर आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर केले जात…
राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांमध्ये झाड पडून मोठे नुकसान झाले आहे तर अनेकांना या दुर्घटनांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला. मुंबईमध्ये झाड कोसळण्याचे…
महापालिकेने केवळ सरकारी जागांवरच नव्हे, तर नागरिकांच्या थेट सहभागातून मुंबई हिरवीगार करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना (सोसायट्यांना) मोफत वृक्षरोपे देण्याचा विशेष उपक्रमही जाहीर केला आहे.या उपक्रमांतर्गत स्थानिक नगरसेवक किंवा आमदार यांच्या माध्यमातून…
विक्रोळी आणि कांजूरमार्ग येथील काही नाले अद्यापही प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि गाळाने पूर्णपणे चोक-अप झाले आहे. यापैकी काही नाले साफ करण्यासाठी पिवळ्या पोकलेनसह नाल्यामध्ये स्थानिक व्यक्तीला कोणत्याही सुरक्षेविना थेट कचऱ्याच्या…
कंत्राटदारांना गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे ३० सेकंदांचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड करणे बंधनकारक होते. या डेटाची संगणकीय तपासणी केली असता कंत्राटदारांचे गंभीर गैरप्रकार उघडकीस आले.
महिनाभरात पालिकेने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३५ हजार ४२८ आस्थापनांची झाडाझडती केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१२४ व्यावसायिकांवर 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
पाईपलाईनमधून गाळ, कचरा आणि इतर अडथळे दूर करून पाण्याचा सुरळीत प्रवाह राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, स्थायी समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त देखभाल करण्यासाठी बीएमसीकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही का?'…
जी/दक्षिण' विभागाअंतर्गत येणाऱ्या रेसकोर्सवरील या बांधकामात बाधित होणारी एकूण २५ झाडे हटवण्याचा मसुदा सहा महिन्यांपूर्वी वृक्ष प्राधिकरणाने मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे सादर केला होता. पण त्याआधीच कंपनीने वृक्षतोड करून त्याचा अहवाल…
महापालिकेने सर्व सातही परिमंडळांसाठी वेगवेगळ्या प्रभागांनुसार सुट्या निविदा काढण्याऐवजी परिमंडळ स्तरावर एकत्रित प्रक्रिया राबवली आहे. यामुळे प्रशासकीय कामात मोठी सुसूत्रता येणार असून वेळेचीही बचत होणार आहे.
Saree Mela 2026 in Mumbai: चेन्नईस्थित सुंदरी सिल्क्स इंडिया ८ आणि ९ जून २०२६ रोजी मुंबईतील बांद्रा वेस्ट येथील कॅशे – द आर्ट्स अँड क्राफ्ट्स गॅलरीमध्ये ‘साडी मेला 2026’चे आयोजन…
महापालिकेने शुक्रवारी 'म्हातारीचा बूट' या वास्तूच्या दुरुस्तीसाठी विविध अभियांत्रिकी संस्थांना आमंत्रित करणारी निविदा काढली.या प्रकल्पात सजावटीचे प्रवेशद्वार आणि नैसर्गिक दगडांना पॉलिश करण्याचाही समावेश असेल.
'स्वच्छ सर्वेक्षण-२०२६' आणि 'मुंबई क्लीन लीग'च्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी 'एम पश्चिम' आणि 'एच पश्चिम' विभाग कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
मागील पाच वर्षांचा ऑडिट अहवाल जाहीर करावा, तृतीय-पक्ष गुणवत्ता तपासणी आणि दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी आदी मागण्या मातेले यांनी केल्या असून कायदेशीर कारवाई जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी संध्याकाळी एक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत दोन नावं होती चर्चेत, ज्यात असिम गुप्ता आणि अश्विनी भिडेंची चर्चा होती.