मुंबई – तीन दिवसांपासून ईडी (ED) पुन्हा एकदा आक्रमक होत, मुंबईत संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, तसेच आदित्य ठाकरे यांचे जवळील सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या घरावर ईडीने छापेमारी करत चौकशी केली. यावेळी सूरज चव्हाण यांच्याकडे चार कोटी रुपये सापडल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर गुरुवारी काही अधिकाऱ्यांची चौकशी ईडीने केली. यावेळी कोरोनाकाळात कथित कोविड घोटाळ्याबाबत या सर्वांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, आता सूरज चव्हाण व इतरांच्या चौकशीचे धागेदोरे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत, असं बोललं जातय. तर दुसरीकडे तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची देखील ईडी चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यांना देखील ईडी समन्स पाठवणार असल्याचं बोललं जातंय. यावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मला ईडीच्या रडावर आणलं गेलं आहे
दरम्यान, माझ्या पक्षाची बैठक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी बोलावलं आहे तर का नाही येणार?, आज मुंबईमध्ये जे काम केलं आहे त्यावर अदानी यांनी सुद्धा आमची जाहिरात केली आहे. जे नियमाने असेल ते होईल. मला ईडीच्या रडारवर आणलं गेल आहे. असं पेडणेकर म्हणाल्या. मी काही केलचं नाही आहे तर ईडी ला का घाबरु? मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत राज्य करायला बरं वाटलं. एखादा ट्रेनमध्ये जर बाजूला चुकून बसला तर तेही राजकीय असेल का त्याच्यावरती प्रश्न होतील का तिकडे बसण्याची व्यवस्था कशी होती. ज्यांना त्यांना त्यांच्या पक्षाची बैठक घेण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षात आम्ही जे जे काही करणार आहोत ते आम्ही दाखवु. आम्हाला कोणत्या संकटात घातलं जात आहे याची कल्पना आहे. अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
माजी महापौर किशोरी पेडणेकरां ईडी चौकशी होणार?
कोविडकाळात किती कोटीची भ्रष्टाचार?
कोविडकाळात पीपीई किटची किंमत चढ्या भावाने का लावली? दररोज ५ हजार किट घेतले गेले, मात्र त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही. रेमडेसिविर एक इंजेक्शन हाफकिनमधून ६६५ रुपयांत मिळत असताना १५६८ रुपये देऊन त्याची खरेदी केली गेली. त्यामुळं मोठा भ्रष्टाचार ठाकरे गटाने केला आहे, जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी किरण पावसकर यांनी केली.