
या पक्षप्रवेशावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. नव्याने भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांनी विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेसकडून या घडामोडींवर अद्याप अधिकृत वि प्रतिक्रिया आलेली नाही. अंबरनाथ महापालिकेतील कु सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला श असून, पुढील काही दिवसांत सत्ता बदलाचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. (BMC Election 2026)
अंबरनाथ येथील १२ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे नगरसेवकपद तांत्रिकदृष्ट्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी कायद्यातील विविध तरतुदींचा अभ्यास सुरू केला आहे. या प्रकरणात काँग्रेस पक्षाने निष्णात वकिलांची फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसने या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली असून, कोणत्याही स्तरावर तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घडामोडींमुळे अंबरनाथच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात या प्रकरणावर कायदेशीर आणि राजकीय पातळीवर तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश
अंबरनाथ नगरपरिषदेचे राजकीय समीकरण सध्या अत्यंत रंजक वळणावर पोहोचले आहे. नगरपरिषदेत एकूण ५७ जागा असून, त्यापैकी शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. संख्याबळाच्या दृष्टीने शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष आहे. याशिवाय भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर एक अपक्ष नगरसेवक आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ची स्थापना केली होती. ३१ नगरसेवकांच्या पाठबळावर भाजपने हे राजकीय ऑपरेशन यशस्वी करत सत्ता हस्तगत केली. (Congress News)
दरम्यान, सत्तेसाठी भाजपने काँग्रेसची साथ घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेस पक्षाने शिस्तीचा बडगा उगारत आपल्या १२ नगरसेवकांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या या निर्णयाचा फायदा घेत भाजपने या सर्व निलंबित नगरसेवकांना थेट आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसचे अस्तित्व सध्या तरी संपुष्टात आल्याचे चित्र दिसत असून, शहर काँग्रेसमुक्त झाल्याचे बोलले जात आहे.
मात्र, या घडामोडींमुळे निर्माण झालेला वाद आता रस्त्यावरून न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. बंडखोर नगरसेवकांचे पद कायम राहणार की अपात्रतेची कारवाई होणार, याकडे अंबरनाथसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.