Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinod Tawade Rajyasabha : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर पोस्ट करुन भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2026 | 02:52 PM
BJP General Secretary Vinod Tawde thanked party leaders after getting Rajya Sabha seat

BJP General Secretary Vinod Tawde thanked party leaders after getting Rajya Sabha seat

Follow Us
Close
Follow Us:

Vinod Tawade Rajyasabha : मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपने राज्यातील चार जणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपने (BJP Politics) सात राज्यसभेच्या जागांपैकी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, (Vinod Tawde) सामाजिक कार्यकर्त्या मायाताई इवनाटे आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही विनोद तावडेंची आहे. त्यांनी भाजप पक्षासाठी केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

 

भाजपने राज्यसभेसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये सहा राज्यांमधून नऊ नावे होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन बिहारमधून राज्यसभेवर येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातून भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे कार्य आणि प्रचार करण्यासाठी विनोद तावडे यांनी मेहनत घेतली आहे. महाराष्ट्र, बिहार आणि इतर राज्यांमध्ये त्यांनी भाजपचा जोरदार प्रसार आणि प्रचार केला. यामधून त्यांची राजनीती आणि संघटनात्मक कार्यशक्ती दिसून आली. याच कौशल्यावर त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर पोस्ट करुन भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानले आहेत. विनोद तावडे म्हणाले की, अनंत आभार आणि आभार! पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही नेहमीच देशहिताची सेवा करण्यास वचनबद्ध आहोत. या नामांकनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार! ही नवीन जबाबदारी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने पार पाडण्यासाठी मी दृढ आणि वचनबद्ध आहे, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

अनंत आभार एवं धन्यवाद! पार्टी की केंद्रीय चुनाव समिति द्वारा राज्यसभा हेतु उम्मीदवार घोषित किये जाने पर शीर्ष नेतृत्व का हार्दिक आभार! माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी के मार्गदर्शन में और राष्ट्रीय अध्यक्ष @NitinNabin जी के नेतृत्व में हम प्रत्येक क्षण राष्ट्र हित के लिए… pic.twitter.com/KrKaff8eeK — Vinod Tawde (@TawdeVinod) March 4, 2026

हे देखील वाचा :  राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील ‘या’ चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब

नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडल्यानंतर, भाजपने विनोद तावडे यांच्यावर विश्वासाने बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. आणि त्यांनी पक्षाचा विश्वास खरा करुन दाखवला. बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांनी बूथ स्तरापर्यंत भाजपची संघटना मजबूत केली. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करुन विजयाचा विश्वास जागवला. 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशाचे ते मुख्य शिल्पकार मानले जातात. त्यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपला तिथे मोठे यश मिळाले.

Web Title: Bjp general secretary vinod tawde thanked party leaders after getting rajya sabha seat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Rajyasabha Election
  • Vinod Tawde

संबंधित बातम्या

Women Reservation Bill : मोदींना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…; विधेयक नामंजूरीवरुन पेटलं राजकारण
1

Women Reservation Bill : मोदींना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही…; विधेयक नामंजूरीवरुन पेटलं राजकारण

संघर्षातून यशाचं शिखर : विनोद तावडे – ‘पार्टी विथ डिफरन्स’चा खरा चेहरा!
2

संघर्षातून यशाचं शिखर : विनोद तावडे – ‘पार्टी विथ डिफरन्स’चा खरा चेहरा!

Nanded News : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही
3

Nanded News : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.