
Latur Election 2026, Latur Election Result 2026,Latur Election Result 2026 Live Updates,
लातूर मनपाच्या या रणमैदानात अनेक स्थानिक नेत्यांचा धक्कादायक असा दारुण पराभव झाला. त्यामध्ये माजी खा. सुनिल गायकवाड यांचे भाचे प्रवीण अंबुलगेकर, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या भगिनी डॉ. दीपा गित्ते, सुनिल गायकवाडांच्या स्नुषा प्रियंका विश्वजित गायकवाड, माजी महापौर सुरेश पवार, माजी गटनेते शैलेश गोजमगुंडे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांचा अख्खा वॉर्ड क्र. ८, भाजपानेत्या डॉ. अर्चनाताई पाटील-चाकूरकरांचे विजयालक्ष्मी रंदाळे, अॅड. मीना गायकवाड, वल्लभ वावरे, शैलेश स्वामी हे चारही राईट हॅण्ड, राज्य कृषीमूल्य आयोगाचे मंत्रिपदाचा दर्जा असलेले अध्यक्ष पाशा पटेल यांचे चिरंजीव अमर पटेल, काँग्रेसच्या माजी महापौर प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, माजी सभापती प्रा. राजकुमार जाधव, रेखा नावंदर, अकबर माडजे, पूजा पंचाक्षरी, अजय मधुकर कोकाटे, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या पत्नी महादेवीताई, सुंदर पाटील, अॅड. गोपाळ बुरबुरे, राजेंद्र इंद्राळे, रवि सुडे, लक्ष्मीकांत मंठाळे, सुनिता चाळक, गौरव काथवटे, लंडन रिटर्न ऐश्वर्या चिकटे, सुहास व्यंकटराव बेद्रे, हेमंत जाधव, माजी महापौर विक्रमसिंह चौहान यांचे चिरंजीव धर्मेंद्रसिंह, विष्णुपंत साठे, माजी नगराध्यक्ष स्व. एस. आर. देशमुख यांचे चिरंजीव गणेश देशमुख, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी नगरसेवक गोरोबा गाडेकर यांच्या पत्नी शकुंतलाताई आदींचा समावेश आहे. तर, १९ सर्वपक्षीय विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा कारभार करण्याची संधी दिली आहे. शहराच्या पूर्व भागावर परंपरेने काँग्रेसचे वर्चस्व होते. ते यंदाही अबाधित राहिले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक-राजीव गांधी चौक ते म. बसवेश्वर चौक (शहराचा पश्चिम भाग) या पट्टयात भाजपाचे नेहमीच वर्चस्व राहिले. यंदाही या पहुंचाने भाजपाला भक्कम साथ दिली, एमआयएमने प्रभाग २ व ४ मध्ये जुगाड लावली होती. पण त्यांच्या ‘पतंगा ‘वा मांजा ऐन संक्रांतीदिवशीच तुटला. भाजपाचा अभेद्या किल्ला म्हणून ख्यात असलेल्या हाय व्होल्टेज प्रभाग १५ मध्ये भाजपाने याही निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड मारुन चारीमुंड्या चित केले. या प्रभागात भाजपाचे प्रवीण कस्तुरे, प्रेरणा होनराव, शीला पाटील, अॅड. दीपक मठपती यानी बाजी मारली, काँग्रेसने अतिशय राजकीय चातुर्य दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.
लातूरकरांनी काँग्रेसच्या विचारावर विश्वास ठेवून लातूर महापालिकेत काँग्रेसला पूर्ण बहुमत दिले, सर्वधर्म समभाव विचार असणारे सुसंस्कृत शहर म्हणून राज्यात या शहराची ओळख आहे. लोकनेते विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यानी या जिल्ह्याची विकासाची विचारांची परंपरा जपलेली आहे. यापुढेही कायम आम्ही सगळे जण मिळून विकासाच्या योजना राबवून लातूर शहर एक विकासाचे मॉडेल म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून निश्चितपणे होईल.
– सहकार महर्षी दिलीपराव देशमुख
Who Will Be Pune’s Next Mayor? कोण होणार पुण्याचा महापौर…? 3 नावांची चर्चा
भाजपाने उमेदवारी देऊन सेवा ८८ पाखयाचे उमेदवारी सेवा मतदारांनीही मताचा वर्षाव केला. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. काँग्रेसच्या जातीचे गणित भाजपाचे विभाजन, राष्ट्रवादीने उभे केलेले उमेदवार यामुळे मतांचे विभाजन झाले. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करून व जनतेला सेवा देऊ.
– प्रवीण कस्तुरे, नवनिर्वाचित नगरसेवक
राष्ट्रवादीच्या सर्व प्रभागातील उमेदवारांना जवळजवळ ४० हजार मिळाली, भाजपाने युती केली असती तर दोघांच्या मिळून ६० जागा निवडून आले असत्या. आपण त्यांना फक्त १९ जागा मागितल्या होत्या. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजापाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांजी चेरीज केली तर काँग्रेस पक्षापेक्षा २००० मतांनी प्रत्येक उमेदवार निवडून आला जास्त पुढे आहे. काँग्रेसचा निवडून आलेला उमेदवार १० मताने या दोघांच्या मतांपेक्षा पुढे आहे. – संजय बनसोडे, आमदार, राष्ट्रवादी अप