Who Will Be Pune's Next Mayor? कोण होणार पुण्याचा महापौर...? 3 नावांची चर्चा
या निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या युतीने पुणेकरांसाठी एक विशेष जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये ‘मोफत मेट्रो आणि बस प्रवास’ असे मोठे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निवडणूक निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की, पुणेकरांनी या आश्वासनांवर फारसा विश्वास दाखवला नाही. भाजपने या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. त्यानंतर आता पुण्यात महापौरपदी कोण विराजमान होणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.
भाजप-119
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- 27
काँग्रेस- 15
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)- 3
शिवसेना (UBT)- 01
मुंबईप्रमाणे पुण्यातही भाजपची एकहाती सत्ता आल्याने पुण्यात पुढचा महापौर भाजपचाच होणार, असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण तो कोण असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, लवकरच 29 महानगरपालिकांमधील महापौरांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या आरक्षणानुसारच महापौरपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. (Municipal Election Result 2026)
गणेश बिडकर हे भाजपचे निष्ठावंत नेते मानले जातात. ते यापूर्वीही नगरसेवक पदावर निवडून आले आहेत. बिडकर यांना महापालिकेच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे. निकालापूर्वीच बिडकर यांच्या नावाचे पुण्यात त्यांचे बॅनर्स लागले होते, या बॅनर्सवर महापौरसाहेब असा उल्लेख करण्यात आला होता.
निकालापूर्वीच लागलेल्या या बॅनर्सची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. पुण्यातील प्रभाग 24 भाजपचे गणेश बिडकर, देवेंद्र वडके, कल्पना बहिरट आणि उज्ज्वला यादव यांचे पॅनेल होते. या पॅनेलने शिंदे गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. (PMC Municipal Elections)
राजेंद्र शिळीमकर हे पुण्याचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते मुरलीधर मोहोळ यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या अनुभवामुळे महापौरपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. या प्रभागातून भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे हे विजयी झाले आहेत. मात्र, याच पॅनेलचे महेंद्र सुंडेचा मुथा यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष आणि महापालिकेतील सभागृह नेतेपदाचा प्रदीर्घ अनुभव धीरज घाटे यांच्या पाठीशी आहे. संघटनात्मक कौशल्य आणि प्रशासकीय कामाचा अनुभव यामुळे त्यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार केला जात आहे. या प्रभागात भाजपच्या पूर्ण पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांमध्ये धीरज घाटे, अमर आवळे, स्मिता वस्ते आणि लता गौड यांचा समावेश आहे.






