शिवसेना अन् राष्ट्रवादीबद्दल अमित शहांचं मोठं विधान, म्हणाले...
पुणे : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनेतेने काेणती शिवसेना आणि एनसीपी ‘असली’ आणि काेणती ‘नकली’ हे दाखवून दिले आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त करीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केले. पुण्यात बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलात पार पडलेल्या प्रधानमंत्री आवास याेजनेच्या (ग्रामीण ) दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थींना स्वीकृती पत्राचे वितरण आणइ दहा लाख लाभार्थ्यांना पहील्या हप्त्याचा वितरण समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाचे काैतुक करताना, राजकीय भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, विधान परीषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील , माधुरी मिसाळ, जयकुमार गाेरे, याेगेश कदम, सुजिता साैनिक आदी उपस्थित हाेते.
केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील वीस लाख लाेकांचे घराचे स्वप्न पुर्ण केल्याचे नमूद करीत, केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले, ‘‘ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला २०४७ सालापर्यंत विकसित देश करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. प्रत्येक व्यक्ती घर, वीज, शाैचालय, सिलेंडर, पाच लाख रुपयापर्यंत आराेग्य विमा सुरक्षा कवच , पाच किलाे धान्य ही विकसित भारताची व्याख्या आहे. महाराष्ट्राने नरेंद्र माेदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. प्रधानमंत्री आवास याेजनेच्या, दुसऱ्या टप्प्यात सगळ्यात जास्त घरे महाराष्ट्राला मिळाली आहे, गैारवास्पद बाब आहे. सर्वांसाठी घर याेजनेत सर्व गरीब घटकांना घर देण्याची याेजना २०२९ पर्यंत पाच काेटी घरे देण्यात येणार आहे. ३ काेटी ८० लाख घरे देण्याचे काम पुर्ण झाले. पहील्या टप्प्यात १३ लाख ५० हजार आता १९ लाख ५० हजार घरे दिली जात आहे. ही वेळेवर दिले जातील याची काळजी घेतली आहे. ’’
महाराष्ट्रात पायाभुत सुविधा उभ्या करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेंदींनी भरपुर तरतुदी केल्या आहेत. राज्यातील महायुतीच्या सरकारने त्या सर्व याेजना प्रत्यक्षात अंमलात आणल्या आणि त्यासाठी स्वत:चा निधीही टाकला आहे. यामध्ये सिंचन याेजना, नदी जाेड, वंदे भारत रेल्वे, १२८ रेल्वे स्थानकांचे पुर्ननिर्माण, पुणे – नागपुर – मुंबई मेट्राेमार्गांचे जाळे उभे करणे, नवीन विमानतळांची उभारणी, १३ हजार काेटी रुपये खर्च करून काेस्टल राेड बांधण्यात आला, वाशी पुलाचे विस्तारीकरण पुर्ण केले, सर्वांत माेठ्या बंदराचे काम महाराष्ट्रात सुरु आहे, खडकवासला ते फुरसुंगी ३४ किमी लांबीचा भुयारी कालव्याच्या कामास मंजुरी, पुणे – काेल्हापुर विमानतळावर नवीन टर्मिनल उभारणी अशा भरपुर याेजना, प्रकल्पांचा यात समावेश आहे.महाराष्ट्राच्या विकासाकरीता केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करीत आहे’’ असे शहा यांनी नमूद केले.
अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ : फडणवीस
वीस लाख लाभार्थींना स्वीकृती पत्र आणि दहा लाख जणांना पहीला हप्ता देणारा हा एैतिहासिक दिवस असल्याचे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, उर्वरीत दहा लाख लाभार्थींच्या बॅंक खात्यात पंधरा दिवसांत पहीला हप्ता जमा हाेईल असे नमूद केले. या याेजनेत राज्य सरकार विविध याेजनेतून एक लाख ६० हजार रुपये इतके अनुदान देत हाेते. यात पन्नास हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच घरे बांधण्यासाठी पाच ब्रास रेती फुकट दिली जाणार आहे, ही रेती उपलब्ध करून देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत, तसेच साेलरचे अनुदानही प्रत्येक लाभार्थींना दिले जाणार असल्याची माहीती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अडीच वर्षात महायुतीच्या काळात रखडलेले प्रकल्प, आम्ही चालना दिल्याचे नमूद केले. लाडकी बहीणसारखी लाेकाभिमुख याेजना सुरु केली, लाडकी बहीण याेजना सुरुच राहणार आहे, ती बंद केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.