Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Amravati News: तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे रक्त नमुने घेऊन सिकलसेलची तपासणी केली. तपासणीदरम्यान सिकलसेल वाहक आणि सिकलसेल रुग्णांची ओळख केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2026 | 02:34 PM
Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Follow Us
Follow Us:

Amravati News: दुर्गम आणि आदिवासीबहुल मेळघाटातील विद्यार्थ्यांना सिकलसेल आजारापासून संरक्षण मिळावे आणि कुपोषणावर नियंत्रण मिळविता यावे, या उद्देशाने विशेष आरोग्य तपासणी व पोषण अभियान सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारच्या खान मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत कार्यरत मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड (एमईसीएल) च्या सीएसआर निधीतून हे अभियान राबविण्यात येत आहे. परिवर्तन समाज विकास समितीच्या माध्यमातून मेळघाटातील विविध आश्रमशाळांमधील ४ हजार विद्यार्थी आणि नागरिकांची मोफत सिकलसेल तपासणी केली जाणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

विद्यार्थ्यांचे रक्त नमुने घेऊन सिकलसेलची तपासणी

अभियानाची सुरुवात धारणी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा, बिजुधावडी येथून करण्यात आली. अभियानाच्या पाचव्या दिवशी इंग्रजी माध्यम बालिका आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे रक्त नमुने घेऊन सिकलसेलची तपासणी केली. तपासणीदरम्यान सिकलसेल वाहक आणि सिकलसेल रुग्णांची ओळख केली जात आहे. तपासणीनंतर राष्ट्रीय सिकलसेल अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थितीनुसार विविध रंगांचे स्टेटस कार्ड देण्यात येत आहेत. तसेच गरजेनुसार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सिकलसेल आजार, उपचारआणि प्रतिबंधाबाबत समुपदेशन केले जात आहे.

गंभीर रुग्णांना तत्काळ रेफरल सुविधा:

अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांची डिजीटल नोंदणी करून रक्त तपासणी केली जात आहे. सिकलसेल वाहक आणि रुग्णांची स्वतंत्र ओळख झाल्यानंतर त्यांना आजार, उपचार तसेच भविष्यातील विवाहपूर्व सिकलसेल तपासणी आणि जोडीदाराच्या तपासणीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. गंभीर रुग्णांना धारणी आणि चिखलदरा येथील उपजिल्हा रुग्णालयांत मोफत रेफरल सेवा तसेच आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

प्रशासकीय समन्वयातून अभियानाला गती; अभियानाच्या यशस्वी:

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (आयटीडीपी), धारणीचे प्रकल्प अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि प्रशासकीय समन्वय महत्त्वाचा ठरला आहे. आश्रमशाळा प्रशासन, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय पथकांच्या समन्वयातून अभियानाला मिळाली आहे.

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण

आश्रमशाळेत पोहोचणार वैद्यकीय पथक

मेळघाटातील दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी दूर जावे लागू नये, यासाठी परिवर्तन समाज विकास समितीचे मोबाइल वैद्यकीय पथक विविध आश्रमशाळांमध्ये पोहोचणार आहे. बिजुधावडी आश्रमशाळेतून अभियानाची सुरुवात झाल्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार इतर आश्रमशाळांमध्येही तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati news sickle cell testing for students in melghat health and nutrition efforts strengthened sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Amaravati
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता
1

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

Health Update: नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयावर यशस्वी उपचार! ५ मिमीचा अडथळा दूर करत श्वसनसंसर्गाचा त्रास थांबविण्यात यश
2

Health Update: नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या हृदयावर यशस्वी उपचार! ५ मिमीचा अडथळा दूर करत श्वसनसंसर्गाचा त्रास थांबविण्यात यश

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
3

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
4

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.