Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या का वाढतेय? जाणून घ्या कारणे आणि वेळीच करा हे उपाय

Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या वाढण्यामागे कोणती कारणे आहेत? जाणून घ्या वाढते वय, वजन, हार्मोनल बदल आणि पोषक घटकांची कमतरता यांचा गुडघ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि गुडघेदुखीपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 22, 2026 | 04:07 PM
Why is the problem of knee pain increasing among women? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Why is the problem of knee pain increasing among women? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महिलांमध्ये गुडघेदुखी वाढण्यामागे वाढते वय, वजन वाढणे, हार्मोनल बदल आणि कॅल्शियम व व्हिटॅमिन D ची कमतरता ही प्रमुख कारणे असू शकतात.
  • गुडघ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दूध, दही, नाचणी, तीळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा तसेच नियमित चालणे व हलका व्यायाम करा.
  • गुडघ्याला सतत सूज येणे, तीव्र वेदना होणे किंवा चालताना त्रास जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आजकाल अनेक महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या वाढताना दिसत आहे. पूर्वी ही समस्या प्रामुख्याने वयोवृद्ध महिलांमध्ये आढळत होती; मात्र आता तरुण आणि मध्यमवयीन महिलांनाही गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागला आहे.ज्यामध्ये योग्य आहाराचा समावेश नसल्यामुळे, सतत उभे राहून काम करणे, चुकीची जीवनशैली, वजन वाढणे आणि शरीरातील पोषक घटकांची कमतरता ही यामागील काही महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घेणे महत्वाचे आहे. महिलांना गुडघेदुखी चा प्रमाण वाढणं हे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.(Women health)

गुडघेदुखीची प्रमुख कारणे कोणती?

१. वाढते वय- वय वाढल्यानंतर गुडघ्यांमधील हाडांच्या सांध्यांवर असलेल्या कूर्चेची (Cartilage) झीज होऊ शकते.सतत कामं करण्यामुळे स्त्रियांचा शरीरातील हाडांची झीज होताना दिसतेय. पण त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि हालचाल करताना त्रास जाणवतो. ऑस्टिओआर्थरायटिस हे गुडघेदुखीचे एक सामान्य कारण आहे.जे आपल्या हाडांना अजूनच कमकुवत बनवते.त्यामध्ये व्यक्तीला एका जागेवर बसताना किंवा उठताना त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला असा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडून निदान करून घ्यावे.

२. वजन वाढणे – शरीराचे वजन जास्त असल्यास गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव येतो.आणि तसेच सांध्यांवर देखील दबाव येतो त्यामुळे सांध्यांची झीज होण्याची शक्यता वाढते आणि चालताना किंवा जिने चढताना वेदना जाणवू शकतात.हा त्रास फक्त वृद्ध व्यक्तीला होईलच असे नाही त्यामध्ये तरुणांना देखील होऊ शकतो त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे आणि योग्य वजन असल्याने हा त्रास कमी जाणवेल

३. हार्मोनल बदल- महिलांमध्ये मेनोपॉजच्या काळात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. या बदलांचा हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या वयात सांधेदुखी आणि हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढतो.

४. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची कमतरता – शरीराला पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D न मिळाल्यास हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते.ज्यामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.

५. व्यायामाचा अभाव- दिवसभर बसून राहणे किंवा शारीरिक हालचाली कमी असणे यामुळे गुडघ्यांच्या आसपासचे स्नायू कमकुवत होऊ शकतात.एकाच जागी हालचाल असल्यास हाडे कमकुवकत होतात जे स्नायूंसाठी हानिकारक आहे त्यामुळे व्यायामाची सवय लावा.

Food recipe: आवळ्याचा गोड लोणचा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा झटपट आणि चविष्ट रेसिपी

गुडघेदुखीपासून बचाव करण्यासाठी काय करावे?

आहारात दूध, दही, पनीर, नाचणी, तीळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन D मिळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सूर्यप्रकाश आणि योग्य आहार घ्यावा.
नियमित चालणे, पोहणे आणि हलका व्यायाम करावा.
वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
बराच वेळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळावे.
वेदना होत असल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Home Remedies: मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा मास्क

कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

गुडघ्याला सतत सूज येणे, तीव्र वेदना होणे, चालताना अडचण येणे किंवा गुडघा लाल व गरम होणे अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

महिलांनी गुडघेदुखीकडे केवळ वाढत्या वयाचा परिणाम म्हणून पाहू नये. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय उपचार यांच्या मदतीने सांध्यांचे आरोग्य चांगले राखता येऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलांमध्ये गुडघेदुखी होण्याची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: वाढते वय, वजन वाढणे, हार्मोनल बदल, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची कमतरता तसेच व्यायामाचा अभाव ही महिलांमध्ये गुडघेदुखी होण्याची काही प्रमुख कारणे आहेत.

  • Que: गुडघेदुखीपासून बचाव करण्यासाठी कोणता आहार घ्यावा?

    Ans: आहारात दूध, दही, पनीर, नाचणी, तीळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D आवश्यक असतात. पूरक औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: गुडघेदुखीचा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे?

    Ans: गुडघ्याला सतत सूज येणे, तीव्र वेदना होणे, चालताना अडचण येणे किंवा गुडघा लाल व गरम होणे अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

Web Title: Why is the problem of knee pain increasing among women sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • ahealth news
  • Health Care Tips
  • women health

संबंधित बातम्या

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स
1

Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

High Blood Pressure च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात
2

High Blood Pressure च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
3

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Employee Health: ऑफिसला जाणाऱ्यांनी आजच ‘या’ सात सवयी लावा, फिट तर राहालच, सोबत वैयक्तिक जीवनही यश येईल
4

Employee Health: ऑफिसला जाणाऱ्यांनी आजच ‘या’ सात सवयी लावा, फिट तर राहालच, सोबत वैयक्तिक जीवनही यश येईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.