Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Blood Pressure च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात

High Blood Pressure: वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बीट, जवस बियांची पावडर आणि दालचिनीची पावडर मिक्स करून बनवलेले पेय प्यावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासोबतच रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 22, 2026 | 01:00 PM
High BP च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या 'हे' ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात

High BP च्या त्रासाने हैराण झाला आहात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या 'हे' ड्रिंक, रक्तदाब राहील नियंत्रणात

Follow Us
Follow Us:

High Blood Pressure: जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे तरुण वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होते. त्यातील अतिशय त्रासदायक आजार म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे अधिक स्पष्ट दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करावेत. वाढत्या रक्तदाबाचा परिणाम हृदय, किडनी आणि शरीराच्या इतर भागांवर होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब वाढल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. गोळ्या औषधांसोबतच या ड्रिंकचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)

Teeth Care: पिवळ्या दातांमुळे हसताना लाजिरवण्यासारखे वाटते? मग स्वयंपाकघरातील पदार्थांचा वापर करून बनवा हर्बल आयुर्वेदिक टूथपेस्ट

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय:

वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या वेळी या ड्रिंकचे सेवन करावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यासोबतच शरीराला सुद्धा फायदे होतात. बीट, जवस, दालचिनी आणि आलं एवढेच पदार्थ लागणार आहेत. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ड्रिंक प्यावे. बीटामध्ये नायट्रेट्स युक्त घटक असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या सैल होण्यास मदत होते आणि शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो. जवस बियांमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबर हृदयाच्या आरोग्यसाठी गुणकारी ठरतात.

दालचिनीच्या सेवनामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. तर आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट शरीराला आलेली सूज कमी करतात. त्यामुळे हे ड्रिंक हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सामान्य रक्तदाब साधारणपणे १२०/८० असावा. पण रक्तदाब वाढल्यानंतर सिस्टोलिक रक्तदाब १३० ते १३९ आणि डायस्टोलिक रक्तदाब ८० ते ८९ दरम्यान असू शकतो. रक्तदाब १८०/१२० पर्यंत पोहचत असेल तर शरीरासाठी धोक्याचे लक्षण आहे.

Sonia Gandhi Favourite Food: वाढलेले वजन कमी करायचे आहे? मग सोनिया गांधीना आवडणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात करा सेवन

ड्रिंक तयार करण्याची कृती:

ड्रिंक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बीटचे तुकडे आणि थोडस पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेले मिश्रण गाळून घ्या. त्यानंतर त्यात जवस बियांची पावडर, दालचिनी पावडर आणि चमचाभर आल्याचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित बीटच्या रसाचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होईल. याशिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कमीत कमी मिठाचा समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी कोणते पेय प्यावे?

    Ans: सकाळी बीटरूटचा रस, कमी मीठ असलेले लिंबूपाणी किंवा साधे पाणी पिणे हा आहाराचा भाग असू शकतो. बीटरूटमधील नायट्रेट्स रक्तवाहिन्यांच्या कार्यास मदत करू शकतात.

  • Que: बीटरूटचा रस प्यायल्याने रक्तदाब कमी होतो का?

    Ans: बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. त्यांचे शरीरात नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे काही लोकांमध्ये रक्तदाबात सौम्य घट दिसू शकते.

  • Que: उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यावा का?

    Ans: रिकाम्या पोटी ज्यूस पिणे आवश्यक नाही. संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादित प्रमाणात फळे किंवा भाज्यांचा रस घेता येतो.

Web Title: Are you troubled by high blood pressure then make it a habit to drink this beverage every morning upon waking up sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • blood pressure
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
1

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Belly Cutter Drinks: ओटीपोटावर वाढलेला चरबीचा घेर होईल कमी! उपाशी पोटी करा ‘या’ पेयांचे सेवन
2

Belly Cutter Drinks: ओटीपोटावर वाढलेला चरबीचा घेर होईल कमी! उपाशी पोटी करा ‘या’ पेयांचे सेवन

Employee Health: ऑफिसला जाणाऱ्यांनी आजच ‘या’ सात सवयी लावा, फिट तर राहालच, सोबत वैयक्तिक जीवनही यश येईल
3

Employee Health: ऑफिसला जाणाऱ्यांनी आजच ‘या’ सात सवयी लावा, फिट तर राहालच, सोबत वैयक्तिक जीवनही यश येईल

Health Update: अचूक निदानासाठी तपासणी यंत्रणा किती सक्षम? डेंग्यू, मलेरियाच्या रॅपिड टेस्टच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित
4

Health Update: अचूक निदानासाठी तपासणी यंत्रणा किती सक्षम? डेंग्यू, मलेरियाच्या रॅपिड टेस्टच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.