Devendra Fadnavis: "अमरावतीत काही चांगले झाले तर..."; विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमात फडणवीसांचे विधान
अमरावती: राज्यामध्ये महायुती सरकारकडून अनेक विकास कामांचे लोकार्पण होत आहे. आता अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळ लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यनमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
अमरावतीमधून बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आमचे सरकार डबल इंजिन सरकार नव्हे तर दाबलंन बूस्टर सरकार आहे. त्यामुळेच आपले सरकार वेगाने चालले आहे. आम्ही तिघेही राज्याचा विकास करत आहोत. आपल्याला राज्याला विकसित करायचे आहे. अमरावतीच माझ्यावर कर्ज आहे. माझी आई अमरावतीची आहे. त्यामुळे अमरावतीशी माझं विशेष नाते आहे. अमरावतीमध्ये काही झाले तर सर्वाधिक आनंद माझ्या आईला होतो.”
Wings of Progress: Amravati Soars High 🛫
LIVE | Inauguration of Amravati Airport and Commercial Passenger Flight Service & Air India FTO's Flight Demo
🕐12.58pm | 16-4-2025📍Amravati.#Maharashtra #Amravati #AmaravatiAirport https://t.co/N5r0O7wMcC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 16, 2025
अमरावतीकरांची प्रतिक्षा संपली!
अमरावती विमानतळ व प्रवाशी विमानसेवेचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक होणार आहे. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थिती आहेत, यासाठी विमानतळ वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आजच संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला, यावेळी 100 पोलीस अधिकारी व 300 पोलीस कर्मचारी असा 400 पोलिसाचा चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. तर 3 हजार लोक बसू शकेल असा भव्य असा मंडप तयार करण्यात आला आहे.
Amravati Airport : अखेर अमरावतीकरांची प्रतिक्षा संपली! विमानतळाचे मुख्यमंत्री फडणवीसांचे हस्ते लोकार्पण
याबाबत भाजप आमदार आमदार रवी राणा म्हणाले की, “यवतमाळ, अकोला भागातले प्रवासीही अमरावती विमानतळाहून मुंबईला जातील. तसेच आगामी काळात स्टार एअरलाईन्स व इंडिगो देखील अमरावती सेवा सुरू करत आहेत. भविष्यात अमरावती ते दिल्ली आणि अमरावती ते पुणे अशा सेवा सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबद्भव देशमुख यांचं नाव मिळावं अशी माझी इच्छा आहे,” असे मत रवी राणा यांनी व्यक्त केले आहे.