अमरावती विमानतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला आहे (फोटो - सोशल मीडिया)
अमरावती : राज्यामध्ये महायुती सरकारकडून अनेक विकास कामांचे लोकार्पण होत आहे. आता अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळ लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यनमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक नेते उपस्थित आहेत. अमरावती विमानतळावर मुंबई ते अमरावती असे प्रवास करणारे हे प्रवासी विमान यशस्वीरित्या दाखल झाले आहे.
अमरावती विमानतळ व प्रवाशी विमानसेवेचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाचे प्रात्यक्षिक होणार आहे. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू, तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थिती आहेत, यासाठी विमानतळ वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असून जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आजच संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला, यावेळी 100 पोलीस अधिकारी व 300 पोलीस कर्मचारी असा 400 पोलिसाचा चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. तर 3 हजार लोक बसू शकेल असा भव्य असा मंडप तयार करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आज (दि.16) सकाळी मुंबई वरून 9 वाजता पहिले प्रवासी विमान अमरावती विमानतळावर आले आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह इतर नेते देखील उपस्थित आहेत. बारा वाजून 30 मिनिटांनी अमरावती वरून मुंबईकरिता हेच विमान उडणार आहे, गेल्या अनेक वर्षापासून अमरावतीकरांची प्रतीक्षा आता संपली आहे.
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमान सेवेचे लोकार्पण, एअर इंडिया एफटीओच्या डेमो फ्लाईटचे उड्डाण#LIVE
https://t.co/xMszhy4OVj— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 16, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत भाजप आमदार आमदार रवी राणा म्हणाले की, “यवतमाळ, अकोला भागातले प्रवासीही अमरावती विमानतळाहून मुंबईला जातील. तसेच आगामी काळात स्टार एअरलाईन्स व इंडिगो देखील अमरावती सेवा सुरू करत आहेत. भविष्यात अमरावती ते दिल्ली आणि अमरावती ते पुणे अशा सेवा सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबद्भव देशमुख यांचं नाव मिळावं अशी माझी इच्छा आहे,” असे मत रवी राणा यांनी व्यक्त केले आहे.