Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: सर्वच पक्षात उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम, बंडखोरीच्या भीतीने सावध; शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांवर पडदा

Amravati Politics News : महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तरी अद्याप अर्ज दाखल करण्याबाबत इच्छुकांनी संयमाची भूमिका घेतली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 26, 2025 | 12:43 PM
सर्वच पक्षात उमेदवारीचा 'सस्पेन्स' कायम, बंडखोरीच्या भीतीने सावध; शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांवर पडदा

सर्वच पक्षात उमेदवारीचा 'सस्पेन्स' कायम, बंडखोरीच्या भीतीने सावध; शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांवर पडदा

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात
  • जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही
  • सर्वच पक्षांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र
Amravati Politics News Marathi: अमरावती महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तरी उमेदवारी जाहीर करण्याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच, लवकर उमेदवारी जाहीर केल्यास बंडखोरी उफाळून येण्याची भीती नेत्यांना सतावत आहे.

त्यामुळे शेवटच्या क्षणीच उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अर्जाची उचल मोठ्या प्रमाणात झाली असली, तरी अद्याप अर्ज दाखल करण्याबाबत इच्छुकांनी संयमाची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीची आस लागलेल्या इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता सर्वच पक्षांचे लक्ष महापालिकेकडे वळले आहे. मात्र, प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने पक्षनेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच प्रत्येक पक्षातील गटातटाचे राजकारण आणि अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कोणाला बसेल, याची धास्ती इच्छुकांमध्ये दिसून येत आहे.

Maharashtra Politics: पैसा है कैसा…नही कोई ऐसा! धनाढ्यांकडून निवडणूक हायजॅक; सामान्यांसाठी…

शेवटच्या टण्यातच ‘एबी फॉर्म’ २०१७ च्या महापालिका निवडणुकीत २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी तब्बल बाराशेपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात होते. यंदाही परिस्थिती वेगळी नसून पहिल्याच दिवशी हजाराहून अधिक अर्जाची उचल झाली आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी यावेळी एबी फॉर्मचे वाटप थेट शेवटच्या टण्यातच केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी दोन-तीन राजकीय पर्याय खुले ठेवत आपली पत्ते अजूनही बंदच ठेवले आहेत. समाजमाध्यमांचा जोरदार वापरः जास्तीत जास्त मतदारांपर्यंत तातडीने पोहोचण्यासाठी इच्छुकांनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर सुरू केला आहे. प्रभागातील प्रश्न, नागरिकांच्या तक्रारी तसेच मागील काळात केलेल्या कामांची माहिती फोटो व किडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर झळकत आहे. प्रत्यक्ष कामातून आणि ऑनलाइन प्रचारातून मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आता अपक्ष लढतीच्या तयारीत

पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची मानसिक तयारी काही इकुकांनी आधीच ठेवली आहे. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नववर्षाच्या कैलेंडरचा प्रचार सुरू झाला आहे. त्यावर स्वतःचा कोटी, मागील टर्ममधील विकासकामांची माहिती आणि
छायाचित्रे छापण्यात आली आहेत, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीचा सस्पेन्स्, बंडखोरीची शक्यता आणि वाढती राजकीय धाकधूक यामुळे शहराचे राजकारण दिवसेंदिवस अधिक तापत चालल्याचे स्पष्ट चित्र आहे.

ही चार वर्षांची प्रशासकीय राजवट

गेल्या चार वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने माजी नगरसेवकांसह नव्याने तयार झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. ‘आता संधी आपलीच’ या भावनेतून अनेकांनी दंड थोपटले असून, इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करू शकता

महापालिका निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या काही दिवसांत अर्जाची संख्या मर्यादित राहण्याची शक्यता आहे. २९ आणि ३० डिसेंबरला अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics : एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक

Web Title: In amravati suspense over candidacy remains in all parties cautious out of fear of rebellion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • amravati
  • BJP
  • shivsena

संबंधित बातम्या

MNS leader joins Shiv Sena : मनसेचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
1

MNS leader joins Shiv Sena : मनसेचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

Nanded News: नांदेड मनपा रणधुमाळी: भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी सगळेच अडचणीत
2

Nanded News: नांदेड मनपा रणधुमाळी: भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी सगळेच अडचणीत

मीरा-भाईंदरमध्ये भाजप–शिवसेना युतीच्या चर्चांना वेग; भाजपाच्या ठोस अटींमुळे राजकीय वातावरण तापले
3

मीरा-भाईंदरमध्ये भाजप–शिवसेना युतीच्या चर्चांना वेग; भाजपाच्या ठोस अटींमुळे राजकीय वातावरण तापले

सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
4

सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.