५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आला होता. याप्रकरणातील दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले.
याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी निखिल संकपाळ (वय ३६, कोथरूड, मूळ रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल असून, पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. दरम्यान, दत्ता चौधरी (वय ३७, धाराशिव), बळिराम ऊर्फ अमित पंडित (वय ४२, भांडूप), आशिष वानखेडे (वय ३५, अमरावती) आणि शैलेश वर्मा (वय ४७, यवतमाळ) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. भूमिश सावे (वय ३८, नालासोपारा) आणि अभिजित फडणीस (वय ४४, वसई) हे दोघे सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
हेदेखील वाचा : Nashik News : हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले आणि परतत असतांना वाटेत भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू
या प्रकरणातील दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तर अटकेत असलेल्या चौघांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया आणि अमृता फडणवीस यांचे वकील अॅड. एस. के. जैन यांनी याला तीव्र विरोध केला. न्यायालयाने चौघांना सशर्त नियमित जामीन मंजूर केला.
दोघांचा जामीन अर्ज फेटाळला
भूमिश सावे आणि अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र फेटाळला. हा मजकूर केवळ ‘रिपोस्ट’ केल्याचा बचाव आरोपींकडून करण्यात आला असला तरी, ते सर्वजण एकाच राजकीय पक्षाशी संबंधित असून, त्यांनी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
हेदेखील वाचा : Hotel Bhagyashree News: खळबळजनक! ‘हॉटेल भाग्यश्री’ च्या मालकाचे अपहरण करून बेदम मारहाण; मालकाने सांगितली आपबिती