Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : नांदेडमध्ये कला महोत्सव ठरला फ्लॉप! रिकाम्या खुर्च्यांसमोर लोककलेचा अपमान

नांदेडमध्ये लाखो रुपये खर्च करुन नांदेड कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कलाकारांनी नाराजी व्यक्त केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2026 | 05:32 PM
Artists expressed their disappointment due to the lack of audience in Nanded Art Festival.

Artists expressed their disappointment due to the lack of audience in Nanded Art Festival.

Follow Us
Follow Us:

नवराष्ट्र : संतोष कुलकर्णी : नांदेड : लाखो रुपयांची उधळपट्टी करून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव प्रेक्षकांच्या अभावी अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरल्याचे विदारक चित्र नांदेडमध्ये (Nanded News) दिसून आले. तीन फेब्रुवारी रोजी कुसुम सभागृहात या महोत्सवाचा शुभारंभ झाला. मात्र पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा उपयोग नेमका कुणासाठी आणि कशासाठी करण्यात आला, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली असतानाही कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे प्रकर्षाने जाणवले.

परिणामी, सातशे ते आठशे प्रेक्षक बसू शकतील इतक्या प्रशस्त सभागृहात केवळ मोजकेच प्रेक्षक उपस्थित होते. या लोककलेच्या उत्सवाला मिळालेला हा अल्प प्रतिसाद प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक ठरत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवात वासुदेव, जागरण गोंधळ, पोतराज, करपल्लवी, लोकवाद्य, कीर्तन तसेच विविध आदिवासी लोककलांचे सादरीकरण ठेवण्यात आले होते. किनवट तालुक्यातील चिखली तांडा, खांबाळा येथून सुमारे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून बंजारा समाजातील पुरुष व महिला कलाकार आपली लोकसंस्कृती सादर करण्यासाठी नांदेडमध्ये आले होते. मात्र त्यांना दिलेला वेळ अत्यंत अपुरा ठरला. महिला कलाकारांना अवघ्या वीस मिनिटांचा तर पुरुष कलाकारांना केवळ पाच मिनिटांचा कालावधी प्रबोधनात्मक सादरीकरणासाठी देण्यात आला. एवढ्या कमी वेळेत बंजारा लोकसंस्कृतीची ओळख करून देणे अशक्य असल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली. कोणत्याही लोककलेची सुरुवात मंगलाचरणाने व प्राथमिक सादरीकरणाने होते.

हे देखील वाचा : रायगडच्या राजकारणात भूकंप! मनसे महाविकास आघाडीतून पडली बाहेर

बंजारा लोकसंस्कृती ही नृत्य किवा गायनापुरती मर्यादित नसून ती त्याच्या जगण्याशी, चालीरीतीशी आणि जीवनमूल्यांशी जोडलेली आहे. ही संस्कृती शहरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या महोत्सवातून मिळेल, अशी कलाकारांची अपेक्षा होती. मात्र प्रेक्षकांच्या अभावामुळे ती अपेक्षा फोल ठरली. या महोत्सवात सुमारे दहा संच सहभागी झाले होते. परंतु दहा-बारा प्रेक्षकांसमोर सादरीकरण करताना कलाकारांची ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वास कमी झाल्याचे जाणवत होते. काही महिला कलाकारांनी किमान अर्धा तास तरी सादरीकरणासाठी मिळायला हवा होता, अशी मागणी केली. तसेच लोककलावंतांना सन्मानाने वागणूक देणे गरजेचे असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. एकूणच या घटनेमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, प्रचार-प्रसार आणि लोककलावंतांच्या सन्मानाबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भविष्यात अशा महोत्सवांचे आयोजन करताना अधिक अभ्यासपूर्ण, नियोजनबद्ध आणि संवेदनशील दृष्टिकोन स्वीकारण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा :  ”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

 

Web Title: Artists expressed their disappointment due to the lack of audience in nanded art festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • daily news
  • maharashtra news
  • nanded news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
1

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
3

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.