Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: नगरकरांनो तुमच्या शहराची प्रतिमा मलीन होतेय! शहरात प्रवेश करताच कचऱ्याने होतेय स्वागत

अहिल्यानगर शहरात प्रवेश करताना कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे शहराची प्रतिमा मलीन होतेय. यावर आता हे कचऱ्याचे ढीग हटवण्याची मागणी होताना दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 05, 2026 | 07:02 PM
नगरकरांनो तुमच्या शहराची प्रतिमा मलीन होतेय!

नगरकरांनो तुमच्या शहराची प्रतिमा मलीन होतेय!

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर शहरात कचऱ्याचे ढिगारे
  • स्वच्छता न केल्यास आंदोलनाचा इशारा
  • कचऱ्यामुळे शहराची प्रतिमा होतेय मलीन
अहिल्यानगर शहरात प्रवेश करतानाच चोहोबाजूंनी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहराची प्रतिमा पूर्णतः मलीन होत असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते तथा जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांनी केला आहे. शहराच्या दर्शनी भागात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा तात्काळ उचलण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील बुऱ्हाणनगर व भिंगार परिसरातून अहिल्यानगरकडे येणाऱ्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. तसेच एमआयडीसीकडून शहरात प्रवेश करताना आणि महामार्गाच्या कडेलाही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. परिणामी, शहरात येणाऱ्या नागरिकांना व पाहुण्यांना सुरुवातीलाच घाणीचे दर्शन घडते, ज्यामुळे अहिल्यानगरची स्वच्छ शहर म्हणून असलेली ओळख धोक्यात आली आहे.

Ahilyanagar News: नेवासात चाललंय तरी काय? उपनगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

स्वच्छता न केल्यास आंदोलनाचा इशारा

एकीकडे शहराला स्वच्छतेसाठी विविध पुरस्कार मिळत असताना, दुसरीकडे प्रवेशद्वारांवरच कचऱ्याचे ढीग दिसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे गवते यांनी नमूद केले. हा कचरा तात्काळ उचलण्यात न आल्यास १४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारात प्रतिकात्मक स्वरूपात कचरा टाकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पर्यावरणरक्षणाची सर्वांचीच जबाबदारी

पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील झाडांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे गवते यांनी सांगितले. झाडतोड थांबली नाही, तर भविष्यात मानवासह सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शासनाने या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाह रं मर्दा ! प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं विक्रमी उत्पादन; ‘आरा’ द्राक्षांना परदेशात मागणी

वाढत्या प्रदूषणावर चिंता

जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेच्या बैठकीत बोलताना गवते यांनी वाढत्या प्रदूषणावर तीव्र चिंता व्यक्त केली. “मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये प्रदूषणाने भयंकर स्वरूप धारण केले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात सुमारे ४२ टक्के वनक्षेत्र होते, आज ते केवळ ०.४ टक्क्यांवर आले आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे,” असे त्यांनी सांगितले.

कचऱ्यामुळे प्राणीजीवन धोक्यात

शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे गायी, कुत्रे यांसारख्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक साचत असून त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे. अहिल्यानगरच्या दर्शनी भागात असलेला हा कचरा जणू येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे स्वागतच करत असल्याची उपरोधिक टीकाही गवते यांनी केली.

Web Title: Bags of garbages seen in the entrance of ahilyanagar city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
1

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
2

Navarashtra Exclusive: ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू
3

वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात
4

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.