Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रपाळीत अतिरिक्त 15 घंटागाड्या कार्यरत; दिवाळीत शहर स्वच्छ राहण्यासाठी नियोजन

दिवाळीनिमित्त शहर परिसरात निर्माण होणारा अतिरिक्त कचरा संकलित मनपासाठी (Nashik Corporation) नेहमी डोकेदुखी ठरते. त्यासाठी महापालिकेने रात्रपाळीतील अतिरिक्त 15 घंटागाड्या सुरू केल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 13, 2023 | 10:49 AM
रात्रपाळीत अतिरिक्त 15 घंटागाड्या कार्यरत; दिवाळीत शहर स्वच्छ राहण्यासाठी नियोजन
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : दिवाळीनिमित्त शहर परिसरात निर्माण होणारा अतिरिक्त कचरा संकलित मनपासाठी (Nashik Corporation) नेहमी डोकेदुखी ठरते. त्यासाठी महापालिकेने रात्रपाळीतील अतिरिक्त 15 घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या माध्यमातून शहरातील बाजारपेठांच्या परिसरातून दररोज सरासरी 12 टन अतिरिक्त कचरा संकलित केला जात असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर घंटागाडीच्या अनियमिततेच्या चौकशी अहवालावर उशिराने का होईना कारवाई सुरू झाली आहे. सहाही विभागांतील चारही घंटागाडी ठेकेदारांना प्रशासनातर्फे नोटिसा बजावल्या होत्या. ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक’ची बिरूदावली मिरवणाऱ्या महापालिकेने घंटागाडीवर शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, केंद्राच्या ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत अव्वल येण्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही.

घंटागाडी योजना राबविली जात असली तरी झोपडपट्ट्या, कामगार वस्ती तसेच बाजारपेठांच्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट स्वच्छ शहर स्पर्धेतील मनपाच्या क्रमवारीत होणाऱ्या घसरणीस कारणीभूत ठरले आहेत. मात्र, प्रशासन सातत्याने घंटागाडी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याने नेमके दोषी कोण यावर कोणीही चर्चा करत नाही.

दिवाळीनिमित्त बाजारपेठांच्या परिसरात होणाऱ्या अतिरिक्त कचऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील बाजारपेठांमध्ये सकाळ आणि रात्री अशा दोन सत्रांत कचरा संकलन सुरू केले आहे. त्यासाठी सहाही विभागांत आवश्यकतेनुसार १५ अतिरिक्त घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: An additional 15 garbage vehicle are operating during the night shift planning to keep the city clean during diwali nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2023 | 10:49 AM

Topics:  

  • Garbage Issue
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
3

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
4

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.