Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; पुणे-मुंबईत सतर्क राहण्याचे आवाहन, कुठे बरसणार पाऊस , जाणून घ्या

Rain Update Maharashtra: पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2025 | 05:24 PM
राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा (फोटो सौजन्य-X)

राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Rain Update Maharashtra in marathi : भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मुंबई हवामान विभागाच्या माहितीनुसार, २० मे रोजी मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तसेच वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी तापमान २६ अंश सेल्सिअस ते दिवसा ३३ अंश सेल्सिअस राहील.

भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मुंबई हवामान अपडेटनुसार, मुंबई उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच कुलाबा येथील शहर वेधशाळेत कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

टेंभुर्णीत महाराजस्व अभियानांतर्गत ३ हजार दाखले निकाली; माढा तहसीलच्या वतीने स्तुत्य उपक्रम

कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी आयमडीकडून पुढील पाच दिवसांसाठी’ऑरेज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि धुळे जिल्ह्यांसाठी पाच दिवसांसाठी यलो इशारा, ज्याचा अर्थ “सतर्क रहा किंवा सावधगिरी बाळगा” असा आहे, तर इतर जिल्ह्यांसाठी हाच इशारा एक दिवस ते चार दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आणि घाट विभागांसह, भारतीय हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट भागात, पाचही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे, तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी, अलर्टचा कालावधी एक ते चार दिवसांपर्यंत आहे. ऑरेंज अलर्ट अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि घाट विभागांमध्ये, “मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांसह गडगडाटी वादळे आणि काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारे” असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पूर्व मान्सून पाऊस पडत आहे.

सणसवाडीनंतर पुण्यात आणखी एक होर्डिंग कोसळलं

पुण्यातून मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात आणखी एक होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील मंतरवाडी येथे होर्डिंग कोसळल्याचं समोर आलं आहे. काही वेळापूर्वी पुण्यातील सणसवाडी मध्ये होर्डिंग कोसळल्याची घडली होती घटना, त्यानंतर आता फुरसुंगीतील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळलं आहे.

सोलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

सोलापूरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सुरूय पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मान्सूनपूर्व कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा. मात्र या मान्सूनपूर्व पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत पडली भर पडली आहे.

रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरीत आज (20 मे) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अवकाळी पावसाचे ढग जमा झाल्यानंतर विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. समुद्रातील चक्रीय वातावरणामुळे कोकणात अवकाळी पाऊस पडत असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. समुद्र किनारपट्टी भागामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या जोरदार सरींमुळे वाहनांची वाहतूक गती मंदावल्याचे चित्र देखील दिसून आले. ढगांचा गडगडात व विजांच्या कडकडाटामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे सुरक्षितता बाळगण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

टेंभुर्णीत महाराजस्व अभियानांतर्गत ३ हजार दाखले निकाली; माढा तहसीलच्या वतीने स्तुत्य उपक्रम

Web Title: An alert for heavy rainfall in region of the state a call for vigilance in pune and mumbai find out where it will rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • rain

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.