Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीला मुलीच्या लग्नासाठी मुभा, अशी सूट म्हणजे दुर्मिळच; सकाळी जाऊन संध्याकाळी कारागृहात परतण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

याचिकाकर्त्याला फाशीची शिक्षा का ठोठावण्यात आली ? हत्या इतकी क्रूर होती का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर याचिकाकर्त्याने मद्यधुंद अवस्थेत आईची हत्या करून तिचे अवयव काढून टेबलवर ठेवले होते, अशी माहिती कुचकोरवीलाच्या वतीने वकील युग चौधरी यांनी न्यायालयाला दिली. आईच्या हत्येमागचा त्याचा हेतू अस्पष्ट आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 20, 2023 | 09:39 PM
former secretary of housing society fined rs 3 lakh high court decision read in detail nrvb

former secretary of housing society fined rs 3 lakh high court decision read in detail nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : आपल्याच आईच्या हत्येप्रकरणी (Mother Murder Case) फाशीची शिक्षा (Death Sentence) झालेल्या दोषसिद्ध झालेल्या आरोपीला (Accused) स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी (Daughter Wedding) उपस्थित राहण्याची मुभा (Exemption) सोमवारी उच्च न्यायालयाने (High Court) दिली. फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींना तात्पुरता जामीन (Provisional Bail), पॅरोल (Parole) किंवा फर्लोसारख्या सवलतींचा अधिकार नाही. परंतु या प्रकरणात दोषसिद्ध आरोपीला मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे हे एक दुर्मिळ प्रकरणच (Rare Case) म्हणावे लागेल.

सुनील कुचकोरवीला कोल्हापूर सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये आईच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करणारी राज्य सरकारची याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यातच आपल्या मुलीच्या लग्नासाठी एक आठवड्याचा तात्पुरत्या जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज कुचकोरवीलाने उच्च न्यायालयात केला होता. त्यावर सोमवारी न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली.

[read_also content=”अफेअर, पैसा आणि खून… बायकोला हवा होता प्रियकर आणि मुलगा होता पैशांचा भुकेला, दोघांनी रचला भयंकर कट; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/shocking-crime-news-wife-killed-husband-in-extra-marital-affair-murder-contract-given-to-lover-in-bharatpur-rajasthan-nrvb-371045.html”]

याचिकाकर्त्याला फाशीची शिक्षा का ठोठावण्यात आली ? हत्या इतकी क्रूर होती का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर याचिकाकर्त्याने मद्यधुंद अवस्थेत आईची हत्या करून तिचे अवयव काढून टेबलवर ठेवले होते, अशी माहिती कुचकोरवीलाच्या वतीने वकील युग चौधरी यांनी न्यायालयाला दिली. आईच्या हत्येमागचा त्याचा हेतू अस्पष्ट आहे. कोणत्या कारणांनी त्याने हे कृत्य केले आणि का केले त्याबाबत कुटुंबीयांमध्येही संभ्रमावस्था आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना एक चांगला माणूस मद्याच्या आहारी गेला होता, असेही चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले. तर आईचे अवयव खाण्याच्या उद्देशाने हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप होता.

दरम्यान, सुनील कुचकोरवीलाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे मुलीच्या लगनासाठी त्याला नेताना लागणाऱ्या पोलीस संरक्षणाचा खर्च उचलण्यास तो असमर्थ असल्याचे निदर्शनास येताच न्यायालयानेही त्याचा संरक्षणाचा खर्च आकारला जाऊ नये, असे आदेश सरकारला दिले. तसेच आरोपी कुचकोरवीला सध्या कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असून मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्याला २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत घरी नेण्यात यावे आणि संध्याकाळी सहा वाजता परत कारगृहात आणावे असे आदेश कारागृह अधीक्षक आणि प्रशासनाला दिले.

[read_also content=”दोन बायका अन् करामती ऐका! त्या दोघींनी एकमेकांच्या पतीवर केलाय बलात्काराचा आरोप, FIR दाखल केली नाही तर दिलीये ‘ही’ धमकी https://www.navarashtra.com/crime/up-crime-news-two-women-in-kanpur-accused-each-other-husband-of-rape-threatened-alert-also-nrvb-371031.html”]

Web Title: An exemption for the death sentence to wedding of a daughter is rare high court order to leave in the morning and return to jail in the evening nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2023 | 09:39 PM

Topics:  

  • High court
  • rare

संबंधित बातम्या

SC-ST विद्यार्थ्यांना फक्त २% आरक्षण मिळणार, उच्च न्यायालयाने नवीन समुपदेशनाला दिली स्थगिती
1

SC-ST विद्यार्थ्यांना फक्त २% आरक्षण मिळणार, उच्च न्यायालयाने नवीन समुपदेशनाला दिली स्थगिती

विज्ञानाचा अद्भुत चमत्कार! लाल नाही तर निळे रक्त असलेले ‘हे’ जलचर अत्यंत दुर्मिळ आणि महागडे
2

विज्ञानाचा अद्भुत चमत्कार! लाल नाही तर निळे रक्त असलेले ‘हे’ जलचर अत्यंत दुर्मिळ आणि महागडे

Save Himachal : सर्वोच्च न्यायालयाचा पर्यटकांना इशारा, ‘तो दिवस दूर नाही जेव्हा नकाशावरून गायब होईल हिमाचल!’
3

Save Himachal : सर्वोच्च न्यायालयाचा पर्यटकांना इशारा, ‘तो दिवस दूर नाही जेव्हा नकाशावरून गायब होईल हिमाचल!’

मोठं काहीतरी घडणार! सुट्टी असून हायकोर्ट उघडले अन्…; जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी
4

मोठं काहीतरी घडणार! सुट्टी असून हायकोर्ट उघडले अन्…; जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.