Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! खुद्द मुख्यमंत्र्यांनाच विमानतळावर 3 तास रोखले; 50 हजारांचा दंडही ठोठावला

दिल्लीच्या सीमांवर दीड वर्षे शेतकऱ्यांना बळजबरीने बसवून ठेवणे असो किंवा पंजाबच्या हक्काचे फंड रोखून ठेवणे असो, केंद्र सरकार प्रत्येक पातळीवर पंजाबचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2026 | 08:43 AM
खुद्द मुख्यमंत्र्यांनाच विमानतळावर 3 तास रोखले; 50 हजारांचा दंडही ठोठावला

खुद्द मुख्यमंत्र्यांनाच विमानतळावर 3 तास रोखले; 50 हजारांचा दंडही ठोठावला

Follow Us
Follow Us:
  • पॅरिसहून परतत असताना दिल्ली विमानतळावर रोखले
  • केंद्र सरकारकडून प्रत्येक पातळीवर पंजाबचा गळा दाबण्याचा प्रयत्न
  • केंद्राने संकुचित मानसिकता दाखवल्याचा आरोप
नवी दिल्ली : आम आदमी पार्टी पंजाबचे मीडिया इन्चार्ज बलतेज पन्नू यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार पंजाब आणि पंजाबियतला खाली लेखण्याची एकही संधी सोडत नाही, असा आरोप त्यांनी केला. पन्नू यांनी सांगितले की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पॅरिसहून परतत असताना दिल्ली विमानतळावर जाणीवपूर्वक तीन तास रोखून ठेवण्यात आले आणि त्यानंतर ५०००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा पंजाबच्या अस्तित्वासह सन्मानावर थेट हल्ला आहे, असेही म्हटले आहे.

केंद्राच्या पंजाब-विरोधी धोरणांची यादी मांडताना पन्नू म्हणाले की, दिल्लीच्या सीमांवर दीड वर्षे शेतकऱ्यांना बळजबरीने बसवून ठेवणे असो किंवा पंजाबच्या हक्काचे फंड रोखून ठेवणे असो, केंद्र सरकार प्रत्येक पातळीवर पंजाबचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत किमान चार वेळा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना परदेश दौऱ्याची परवानगी दिली गेली नाही; कारण मोदी सरकारला भीती वाटते की, मुख्यमंत्री परदेशात गेले तर तिथून गुंतवणूक आणि निधी आणून पंजाबला प्रगतीच्या मार्गावर नेतील.

मोठी बातमी ! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील ‘ती’ तक्रार खरी; केंद्राने अखेर केले मान्य

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जेव्हा मुख्यमंत्री भगवंत मान फ्रान्स दौऱ्यावर गेले, जिथे ते जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या फूड फेस्टिव्हलमध्ये पंजाबचे प्रसिद्ध राजमा आणि पांढरे चणे सारख्या उत्पादनांचे लॉन्चिंग करण्यासाठी गेले होते. तिथेही केंद्र सरकारने आपली संकुचित मानसिकता दाखवली, असा आरोपही पन्नू यांनी केला.

FAQ :

नेमकं काय झालं? 3 तास का रोखले?
– दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (T-3) वर हा प्रकार घडला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पत्नी डॉ. गुरप्रीत कौर पॅरिसहून Air France फ्लाइटने रात्री 11 वाजता परतले. तेव्हा त्यांना रोखण्यात आले.

दंड का लागला? Green Channel vs Red Channel काय?
– विमानतळावर 2 चॅनेल असतात. एक Green Channel – ‘Nothing to Declare’ – काही जाहीर करायचे नाही, सरळ बाहेर तर Red Channel – ‘Goods to Declare’ – महागड्या वस्तू, मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास कस्टम भरून जावे लागते.

पॅरिसला का गेले होते? आधी परवानगी नाकारली होती का?
– SIAL Paris 2026 – जगातील दुसरा सर्वात मोठा फूड फेस्टिवल – 17 ते 21 ऑक्टोबरला झाला. पंजाबच्या राजमा, हरभरा, Markfed उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रमोट करण्यासाठी गेले.

Web Title: Bhagwant mann held up at airport for 3 hours also slapped with a fine of 50000 rupees nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • High court
  • political news

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील ‘ती’ तक्रार खरी; केंद्राने अखेर केले मान्य
1

मोठी बातमी ! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील ‘ती’ तक्रार खरी; केंद्राने अखेर केले मान्य

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत पुढील वर्षी होणार विधानसभेच्या निवडणुका; तयारीला आला वेग
2

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत पुढील वर्षी होणार विधानसभेच्या निवडणुका; तयारीला आला वेग

अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
3

अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना…
4

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.